Thursday, September 24, 2026
Homeनागपूरचित्रपट गीतावर नाचणे चार पोलिस कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवले... - चारही पोलीस कर्मचारी...

चित्रपट गीतावर नाचणे चार पोलिस कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवले… – चारही पोलीस कर्मचारी निलंबित…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानंतर पोलिस ठाण्याच्या आवारात चित्रपट गीतावर नाचणे चार पोलिस कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवले आहे.या प्रकरणात त्यांना निलंबित करण्यात आले आहे.हे चारही कर्मचारी तहसील पोलिस ठाण्यातील आहेत.
१५ ऑगस्ट रोजी तहसील पोलिस ठाण्यात स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमानंतर देशभक्तीपर गीते लाउडस्पीकरवर वाजविण्यात आली.त्यावर कर्मचाऱ्यांनी ठेका धरला होता.मात्र,त्यानंतर एका कॉन्स्टेबलला ‘छोरा गंगा किनारे वाला’ हे गाणे गायची हुक्की आली.त्याने गाणे गायला सुरुवात केली व आग्रहापोटी एक सहायक पोलीस उपनिरीक्षक तसेच दोन महिला कर्मचाऱ्यांनी फेर धरीत नृत्य केले.त्याचा ठाण्यातील एका कर्मचाऱ्याने व्हिडीओ काढला.तो काही वेळातच व्हायरल झाला.पोलिसही माणूस आहेत; त्यांनाही स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचा अधिकार आहे; असे म्हणून अनेकांनी तहसील पोलिस ठाण्यात झालेल्या या आगळ्यावेगळ्या स्वातंत्र्यदिनाच्या जल्लोषाचे नेटिझन्सने स्वागत केले.
मात्र,काही काळाअगोदर वरिष्ठ पातळीवरून यासंदर्भात निर्देश जारी करण्यात आले होते व गणवेशात नाचण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. याचे उल्लंघन केल्याची बाब वरिष्ठांकडून गंभीरतेने घेण्यात आली.मुख्यालयातून त्यांचे निलंबन करण्याचे आदेश देण्यात आले.चौघांनाही निलंबित करण्यात आले आहे.
कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर👇
दरम्यान,या कारवाईनंतर पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये  नाराजीचा सूर आहे.चौघेही जण स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात पुढाकार घेत सहभागी झाले होते.त्यांनी दोन देशभक्तिपर गीतेदेखील म्हटली होती.
कार्यक्रम झाल्यावर थोडा ताणतणाव हलका करण्यासाठी गाणे गात नृत्य केले.मात्र त्यासंदर्भात निलंबनाची कारवाई करणे हा अन्यायच असल्याची अनेक कर्मचाऱ्यांची भावना आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुरुड,कोंढाळा,सावंगी व विसोरा गावातील रिक्त कोतवाल पद भरण्यास शासनाची मान्यता.. – महिला आरक्षण व रिक्त पदे भरण्याकरिता जातीचा प्रवर्ग निश्चित करण्यासाठी विशेष सभा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कुरुड,कोंढाळा,सावंगी व विसोरा गावातील गेल्या अनेक कालावधीपासून रिक्त असलेले कोतवाल(महसुल सेवक)पद भरण्यास शासनाने मान्यता दिली असून संबंधित गावातील...

कृषी विभागातील तब्बल १४ हजार ४४५ तांत्रिक अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून दुष्काळग्रस्तांना एक दिवसांचे वेतन..

उद्रेक न्युज वृत्त :-निसर्गाच्या लहरीपणाचा नेहमीच शेतकरी बांधवांना फटका सहन करावा लागतो आहे. कधी अवकाळी पाऊस,तर कधी किडीचा प्रादुर्भाव,तर कधी ऐन हंगामात धो-धो पावसामुळे...

सायबर फसवणूक टाळण्यासाठी डिजिटल व्यवहारात सतर्कता आवश्यक- इंटर-ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टीमचे राज्य समन्वयक संजय त्रिपाठी – अनोळखी लिंक,संदेश अथवा आमिषांना प्रतिसाद देण्यापूर्वी त्यांची खातरजमा...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डिजिटल व्यवहार आणि सोशल मीडियाचा वापर वाढत असतांना सायबर गुन्ह्यांच्या पद्धतीही बदलत आहेत.ऑनलाइन आर्थिक फसवणूक आणि वैयक्तिक माहितीच्या गैरवापरापासून स्वतःचे संरक्षण...

ग्राम रोजगार सेवकांसाठी आनंदाची बातमी; मानधन आणि सेवा अटींचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी.. – आठ हजार रुपये मिळणार मानधन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र रोजगार हमी (विकसीत भारत रोजगार व आजीविका(ग्रामीण) योजना),२०२६ तसेच तत्कालिन महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत पातळीवर सरपंच व ग्रामसेवक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!