Wednesday, September 2, 2026
Homeनागपूरचालत्या ट्रॅक्टरवरून खाली उतरण्याच्या प्रयत्नात रोटाव्हेटरमध्ये अडकून युवकाचा मृत्यू

चालत्या ट्रॅक्टरवरून खाली उतरण्याच्या प्रयत्नात रोटाव्हेटरमध्ये अडकून युवकाचा मृत्यू

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-शेतात रोटाव्हेटर करीत असतांना ट्रॅक्टरवर बसलेला युवक खाली उतरतांना त्याचा पाय अडकला आणि तो चालू रोटाव्हेटरमध्ये अडकला.यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा उपचारास नेतांना वाटेतच मृत्यू झाला असल्याची घटना नरखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सावरगाव शिवारात काल,रविवारी १० नोव्हेंबरच्या सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.
स्वप्नील रमेश ठोंबरे वय १९ वर्षे,रा.सावरगाव,ता. नरखेड,जि.नागपूर असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्या वडिलांकडे ट्रॅक्टर आहे.त्याच्या स्वतःच्या शेतात रविवारी रोटाव्हेटर करणे सुरू होते.चुलत भाऊ ट्रॅक्टर चालवित होता स्वप्नील बाजूला बसला होता. रोटाव्हेटरचे काम सुरू असतांना स्वप्नीलने चालत्या ट्रॅक्टरवरून खाली उतरण्याचा प्रयत्न केला आणि पाय अडकल्याने तो खाली रोटाव्हेटरमध्ये अडकला. पडून स्वप्नील उतरत असल्याचे त्याच्या ट्रॅक्टरचालक चुलत भावाला माहिती नव्हते.रोटाव्हेटर फिरणे थांबल्याने हा प्रकार त्याच्या लक्षात आला.तोपर्यंत स्वप्नील गंभीर जखमी झाला होता.सावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार केल्यानंतर त्याला नागपूर शहरातील मेडिकल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.त्याच्या पार्थिवावर आज,सोमवारी दुपारी सावरगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!