- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशनचा दुसरा दिवस शेतकरी बांधवांच्या विविध मुद्यांनी गाजला.विशेष म्हणजे,आमदार सुधीर मुनगंटीवार तसेच विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधून घेतले.प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना उपस्थित करून अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेल्या पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपयांपर्यतचे अनुदान जाहीर केले गेले होते.यासाठी २५ मार्च २०२५ रोजी शासन निर्णय निर्गमित केला होता.मात्र अद्याप अनुदानाची रक्कम दिली नसल्याचे मुनगुंटीवार म्हणाले.निधी शेतकऱ्यांसाठी अनुदान देतांना विविध कारणे देऊन टाळले जाते,मात्र आमदारांचा पगार वाढवितांना कोणतेही कारण दाखविले जात नाही,अशी टीका मुंगटीवार यांनी केली.काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवर यांनीही सरकारवर टीकास्त्र सोडले.शासकीय कर्मचाऱ्यांची वेतनवाढ,भत्ते वाढ यात शासन कुठलेही नियम घालत नाही,मात्र शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय घ्यायचा झाला तर बैठका घ्याव्या लागतील,निकष आणि निर्बंध लादले जातील ही शासनाची निती आहे.नुकतेच ११ जिल्ह्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले,त्याचे पंचनामे तात्काळ करून नुकसानभरपाई व धानाचा बोनस देण्यात यावा अशी मागणी वडेट्टीवार यांनी सभागृहात केली.त्यानुसार,राज्यमंत्री योगेश कदम यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांचे अवकाळीमुळे मोठे नुकसान झाले. ते भरून काढण्यासाठी हेक्टरी २० हजार रुपये जाहीर केलेले अनुदान देण्याबाबत लवकरच मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही त्यांनी सभागृहात दिली.विशेष म्हणजे, चंद्रपूर,गडचिरोली,भंडा रा आणि गोंदिया या जिल्ह्यांतील धान उत्पादक शेतकऱ्यांचे अवकाळीमुळे मोठे नुकसान झाले होते.त्यानुसार,अनुदान देण्याबाबत लवकरच विभागाकडून मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात येईल,असेही राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केल्याचे शेतकऱ्यांचा बोनस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
- Advertisement -

