Friday, September 25, 2026
Homeछत्रपती संभाजी नगरचक्क उपजिल्हाधिकारी अडकला एसिबीच्या जाळ्यात.. - घराच्या झाडाझडतीत सापडले मोठे घबाड; ५९...

चक्क उपजिल्हाधिकारी अडकला एसिबीच्या जाळ्यात.. – घराच्या झाडाझडतीत सापडले मोठे घबाड; ५९ तोळे सोने,१३ लाख रुपये रोकडसह ६७ लाखांचा ऐवज जप्त..

- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
छत्रपती संभाजीनगर :-पूर्वीचे औरंगाबाद व आताचे छत्रपती संभाजीनगर नावाने उदयास आलेल्या जिल्ह्यात चक्क उपजिल्हाधिकारीच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याची घटना काल,मंगळवार २७ मे रोजी दुपारच्या सुमारास जिल्हा कचेरीसमोर घडली.निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी तक्रारदाराकडे ४१ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.यातील पहिल्या टप्प्यातील २३ लाख रुपये संबधित तक्रारदाराकडून आधीच घेतले होते.त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात १८ लाखांची पुन्हा मागणी करण्यात आली.अश्यातच दुसऱ्या टप्प्यातील १८ लाखापैकी ५ लाख रुपयांची लाच अव्वल कारकुन दिलीप त्रिभुवन मार्फत घेण्यात येत असतांनाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडुन उपजिल्हाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले.त्यानंतर एसीबीने लाचखोर उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकरच्या घरी धाड टाकली असता मोठे घबाड सापडले आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विनोद खिरोळकर यांच्या घरातून तब्बल १३ लाख ६ हजार ३८० रुपयांची रोकड,५० लाख ९९ हजार ५८३ रुपयांचे ५८९ ग्रॅम म्हणजेच ५९ तोळे सोन्याचे दागिने, तसेच ३ लाख ३९ हजार ३४५ रुपय किंमतीचे ३ किलो ५५३ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने,यांसह इतर काही मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम असा एकूण ६७ लाख ४५ हजार ३०८ रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

काय आहे प्रकरण👇

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
तक्रारदार आणि त्यांचे सहकारी यांनी छत्रपती संभाजीनगर परिसरातील तिसगाव येथे ६ हजार १६ गुंठे वर्ग-२ मधील जमीन नियमानुसार घेतली.रजिस्ट्री खरेदीखतही करून घेतले.वर्ग-२ मधील जमीन वर्ग-१ मध्ये करून देण्यासाठी नियमानुसार शासनाकडे काही रक्कम भरावी लागते.या प्रक्रियेसाठी खिरोळकर आणि त्रिभुवन यांनी यापूर्वी २३ लाख रुपये घेतले. पुन्हा चलन देण्यासाठी १८ लाख रुपयांची मागणी केली.त्यातील पाच लाख रुपये काल,मंगळवारी २७ मे रोजी देण्याचे ठरले होते.अश्यातच फटाका फुटला आणि निवासी उपजिल्हाधिकारी अडकला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा फटका..! भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद; ६३ गावांचा तुटला संपर्क..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या विविध भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे.अश्यातच जिल्ह्यातील पर्लकोटा नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली...

जुनी वडसा येथे झुडपी जंगलातील वनपट्ट्यांबाबत सभापती सचिन खरकाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषद हद्दीतील जुनी वडसा येथील झुडपी जंगल परिसरावर वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या आणि शेती कसत असलेल्या नागरिकांना वनजमिनीचे पट्टे मिळवून देण्यासाठी...

शिधापत्रिकाधारकांनी १५ दिवसांत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना धान्याचा लाभ नियमितपणे मिळावा आणि शिधापत्रिकेवरील सदस्यांची माहिती अचूक व अद्ययावत राहावी,यासाठी गडचिरोली तालुक्यात ई-केवायसी प्रक्रिया...

“आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही; मला माफ करा” अशी चिठ्ठी लिहून वकिलाने घेतला गळफास.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुण वकिलाने गळफास घेण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली.त्यात "आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही,मला माफ करा.माझ्या बहिणीकडे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!