Friday, September 25, 2026
Homeछत्रपती संभाजी नगरविजांचा तांडव; अंगावर विज पडून एकाच तालुक्यातील चार जणांचा मृत्यू.. - दोन...

विजांचा तांडव; अंगावर विज पडून एकाच तालुक्यातील चार जणांचा मृत्यू.. – दोन सख्ख्या भावंडांचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
छत्रपती संभाजीनगर :-जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस कोसळल्याने बऱ्याच ठिकाणी शेतकरी शेतबांधावर जाऊन पेरणी करू लागलेत.अश्याच प्रकारे आज, शनिवार १४ जून रोजी पेरणी व इतर कामे करण्यासाठी शेतबांधावर गेलेल्या एकाच तालुक्यातील चार जणांचा अंगावर विज पडून मृत्यू झाल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली.चार जणांपैकी दोन सख्ख्या भावांचाही वीज पडून मृत्यू झाला आहे.सदरच्या घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यात घडल्या.
पहिल्या घटनेत सिल्लोड तालुक्याच्या सारोळा गावातील दोन सख्ख्या भावंडांचा अंगावर विज कोसळून मृत्यू झाला आहे.दोन्ही भावंडे आपल्या आईसह शेतात पेरणीसाठी गेली होती.शेतात उभे असतांना अचानकपणे पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ते एका झाडाच्या आडोशाला गेले.तितक्यातच विजांचे कडकडाट सुरू होऊन वीज दोघांच्याही अंगावर कोसळली.यात रोहित राजू काकडे वय २१ वर्षे व यश राजू काकडे वय १७ वर्षे हे दोघेही जागीच गतप्राण झाले.
दुसऱ्या घटनेत सिल्लोड तालुक्याच्या मोढा बुद्रूक येथे दुपारी दोन वाजेच्या सुमारास विजांचा कडकडाट सुरू झाल्यानंतर शेतातून घरी जात असतांना ४८ वर्षीय रंजना बापू शिंदे यांचा वीज कोसळून मृत्यू झाला.
तिसऱ्या घटनेत सिल्लोड तालुक्याच्या पिंपळदरी गावातील दोघे भाऊ शेतात कामे करीत असतांनाच अचानकपणे विजांचे कडकडाट होऊन २८ वर्षीय
शिवराज सतीश गव्हाणे याच्या अंगावर वीज कोसळली.त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला तर भाऊ जीवन सतिश गव्हाणे गंभीर जखमी झाला.त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.आज शनिवारी एकाच तालुक्यातील चार जणांचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली आहे.त्यातच अन्वी शिवारातील शेतकरी नारायण सांडू बांबर्डे यांच्या शेतात वीज कोसळून एक म्हैस ठार झाली.तर दुसऱ्या घटनेत मांडणा येथील शेतकरी ज्ञानेश्वर माणिकराव लोखंडे यांच्याही शेतात वीज कोसळून तीन वासरे ठार झालीत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा फटका..! भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद; ६३ गावांचा तुटला संपर्क..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या विविध भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे.अश्यातच जिल्ह्यातील पर्लकोटा नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली...

जुनी वडसा येथे झुडपी जंगलातील वनपट्ट्यांबाबत सभापती सचिन खरकाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषद हद्दीतील जुनी वडसा येथील झुडपी जंगल परिसरावर वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या आणि शेती कसत असलेल्या नागरिकांना वनजमिनीचे पट्टे मिळवून देण्यासाठी...

शिधापत्रिकाधारकांनी १५ दिवसांत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना धान्याचा लाभ नियमितपणे मिळावा आणि शिधापत्रिकेवरील सदस्यांची माहिती अचूक व अद्ययावत राहावी,यासाठी गडचिरोली तालुक्यात ई-केवायसी प्रक्रिया...

“आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही; मला माफ करा” अशी चिठ्ठी लिहून वकिलाने घेतला गळफास.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुण वकिलाने गळफास घेण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली.त्यात "आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही,मला माफ करा.माझ्या बहिणीकडे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!