Friday, September 11, 2026
Homeछत्रपती संभाजी नगरउमेदवाराचा झालेला पराभव जिव्हारी लागल्याने दोन तरुणांनी विष प्राशन करून केला आत्महत्येचा...

उमेदवाराचा झालेला पराभव जिव्हारी लागल्याने दोन तरुणांनी विष प्राशन करून केला आत्महत्येचा प्रयत्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
छत्रपती संभाजीनगर :-जिल्ह्यातील कन्नड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांचा झालेला पराभव जिव्हारी लागल्याने तालुक्यातील जामडी घाट येथील दोन तरुणांनी विष प्राशन करून आत्महत्याचा प्रयत्न केला असल्याची घटना काल शनिवारी दुपारी हा प्रकार घडला.
सुनील रामदास शिरसाठ वय ४२ वर्षे आणि आनंद वसंत जाधव वय ३० वर्षे अशी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांची नावे आहेत.हे दोघेही जामडी घाट येथील रहिवाशी आहेत.काल,शनिवारी २३ नोव्हेंबरच्या सकाळी आठ वाजता मतमोजणी फेऱ्यांना सुरुवात झाली.दुपारी साडेबारावाजेच्या सुमारास चौदाव्या फेरीअखेरही अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांचे मतदान न वाढल्याने त्यांचा पराभव निश्चित आहे हे लक्षात येताच सुनील शिरसाठ याने विष प्राशन केले.त्यास नातेवाईकांनी कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.यावेळी त्यास पाहण्यासाठी मित्र आनंद जाधव हा आला. त्यानेही रुग्णालयाच्या बाहेर येत विष प्राशन केले. दोघांनाही कन्नड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.नंतर आनंद जाधव यास पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच हर्षवर्धन जाधव यांनी रुग्णालयात भेट देऊन शिरसाट यांच्या प्रकृतीची विचारपूस करत असे चुकीचे कृत्य न करण्याचे आवाहन मतदारसंघातील तरुणांना केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले दोन हजार; लीपिकास ऑफिसमध्येच पकडले एसीबीने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य खात्यातील लीपिकाने शासकीय फी व्यतिरिक्त अतिरिक्त लाचेच्या रकमेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(ACB) पथकाने सापळा...

ऐन सणाच्या दिवशीच दुर्दैवी घटना..! आयशर ट्रक आणि ट्रॅक्सचा भीषण अपघात; आठ जणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-ऐन तान्हा पोळा सणाच्या दिवशीच भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.आज,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!