Friday, June 19, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातील ९ आरोग्य संस्थांना 'कायकल्प' पूरस्कार जाहीर..

गडचिरोली जिल्ह्यातील ९ आरोग्य संस्थांना ‘कायकल्प’ पूरस्कार जाहीर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-सार्वजनिक आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता आणि स्वच्छतेचे उच्चांक गाठण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेल्या “कायकल्प” योजनेमुळे गडचिरोली आरोग्य संस्थांमध्ये लक्षणीय सुधारणा होत आहे.या योजनेमुळे रुग्णांना चांगल्या आणि सुरक्षित वातावरणात उपचार मिळत असून,आरोग्य कर्मचाऱ्यांचेही मनोधैर्य उंचावले आहे.
“कायकल्प” योजना ही आरोग्य सुविधांमधील स्वच्छता,संक्रमण नियंत्रण,कचरा व्यवस्थापन, रुग्णसुरक्षा आणि इतर महत्त्वाच्या बाबींमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रोत्साहन देते.या योजनेअंतर्गत आरोग्य संस्थांचे मूल्यांकन केले जाते आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.यामुळे आरोग्य संस्थांमध्ये निरोगी स्पर्धा निर्माण झाली असून,सर्वत्र सुविधांचा दर्जा सुधारण्यास मदत झाली आहे.
  • कायकल्प योजनेचे प्रमुख उद्दिष्ट्ये👇
 रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांमध्ये स्वच्छतेचे उच्चांक राखणे.
 संक्रमण नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करणे.
 वैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे.
 रुग्ण सुरक्षा सुनिश्चित करणे.
 रुग्णालयाच्या परिसराचे सुशोभीकरण करणे.
 कर्मचाऱ्यांचे आरोग्य आणि स्वच्छतेबद्दलचे ज्ञान वाढवणे.
कायाकल्प योजनेअंतर्गत दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्राना पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.प्रथम पुरस्कार प्राथमिक आरोग्य केंद्र देलनवाडी व प्रोत्साहन पर पुरस्कार प्राथमिक आरोग्य केंद्र आरेवाडा,प्रा.केंद्र मालेवाडा,प्रा.केंद्र कूरुड,प्रा.केंद्र आलापल्ली,प्रा.केंद्र जीमलगट्टा यांना प्राप्त झालेला आहे.तसेच आरोग्य उपकेंद्र वाकडी, उपकेंद्र विसोरा,उपकेंद्र घाटी ला पुरस्कार जाहीर झाला आहे.याकरिता सदर प्रा.केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व संपूर्ण टीमचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.प्रा.केंद्र देलनवाडी यांचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय सुपारे,प्रा.केंद्र मालेवाडा येथील डॉ.प्रमोद उंदीरवाडे,प्रा.केंद्र आरेवाडा येथील डॉ. सतीश तिरणकर,प्रा.केंद्र आलापल्ली येथील डॉ.उईके, प्रा.केंद्र जीमलगटा येथील डॉ.किरण वानखेडे,डॉ.दुर्गा जराते,उपकेंद्र वाकडी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. स्वाती कांबळी यांचे अभिनंदन सर्व स्तरातून होत आहे.जिल्ह्याचे कायकल्प कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. अनुपम महेशगौरी,जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.प्रफुल्ल हुलके यांनी कायकल्प कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केली.याबदल त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी अभिनंदन केले.
  • मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे👇
गडचिरोली जिल्ह्यमध्ये, “कायकल्प” योजनेच्या अंमलबजावणीमुळे अनेक सकारात्मक बदल दिसून आले आहेत.यामध्ये रुग्णालयांमधील स्वच्छतागृहांची सुधारित स्थिती,स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता,ऑपरेशन थिएटरमधील निर्जंतुकीकरण प्रक्रियांचे काटेकोर पालन आणि रुग्णांसाठी अधिक मैत्रीपूर्ण वातावरण यांचा समावेश आहे.यामुळे रुग्णांचा आरोग्य सेवांवरील विश्वास वाढला असून, त्यांना दर्जेदार उपचार मिळत आहेत. “कायकल्प योजना ही केवळ स्वच्छतेपुरती मर्यादित नाही,तर ती एक व्यापक दृष्टीकोन आहे,जो सार्वजनिक आरोग्य सेवांचा चेहरामोहरा बदलत आहे.या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आम्ही सर्व आरोग्य कर्मचारी,प्रशासन आणि स्थानिक नागरिकांचे आभार मानतो.”
  • जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे👇
भविष्यातही, “कायकल्प” योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू ठेवून,जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आणि स्वच्छ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गडचिरोली हे भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक व पोलाद उत्पादन केंद्र म्हणून...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात,अशी...

माजी सैनिकास पैश्याची मागणी; महिला लिपिक एसीबीच्या कचाट्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-एका ३६ वर्षीय महिला लिपिकेस(महसुल सहाय्यक)माजी सैनिक यांचे ताब्यात असलेली सिलींगची अतिक्रमीत जमीन माजी सैनिक म्हणुन त्यांचे नावावर नियमीत करुन देण्याच्या...

बळीराजासमोर यंदा महागाईचे नवे आव्हान; खत, बियाणे महागले..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधवांची जिकडून-तिकडून पिळवणूक सुरू आहे.पावसाळ्याचे महिने सुरू होऊनही कित्येक दिवसांपासून पाऊस पडण्याचे नावाच घेत नाहीये.अश्यातच आभाळाकडे आशेने नजरा लावून बसलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!