Tuesday, September 1, 2026
Homeमुंबईचंद्रपूर जिल्ह्यात 'मत चोरी'; राहुल गांधींनी केला भांडाफोड..

चंद्रपूर जिल्ह्यात ‘मत चोरी’; राहुल गांधींनी केला भांडाफोड..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा मतदारसंघात ६ हजार ८५० मतदार वाढवल्याचा दावा काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. मत चोरी ही कार्यकर्त्यांच्या हातून झाली नाही,तर यासाठी खास मॉडेल तयार करण्यात आले आणि कॉल सेंटरच्या माध्यमातून हा प्रकार राबवण्यात आला.या प्रकाराला स्वतः केंद्रीय निवडणूक आयोगाचे समर्थन मिळत असल्याचाही आरोप राहुल गांधी यांनी केला. ‘मत चोरी’ मागे एक मोठे षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त केला आहे.कर्नाटकातील विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांतील उदाहरणे देतांना,त्यांनी महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघाचाही उल्लेख केला.राजुरा मतदारसंघ हा चंद्रपूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचा भाग असून, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे.या मतदारसंघात एकूण ३ लाख १५ हजार ७३ नोंदणीकृत मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या १ लाख ५९ हजार ८२१ असून,१ लाख ५५ हजार २५२ महिला मतदार आहेत.तर ३४४ मतदान केंद्रे आहेत.राजुरा विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने भाजपचे देवराव विठोबा भोंगले यांना उमेदवारी दिली होती,तर महाविकास आघाडीने काँग्रेसचे धोटे सुभाष रामचंद्रराव यांना निवडणुकीत उतरवले होते.या निवडणुकीत भाजपचे देवराव भोंगले यांनी काँग्रेसचे सुभाष धोटे यांचा ३ हजार ५४ मतांनी पराभव केला होता.देवराव भोंगले यांना ७२ हजार ८८२ मत मिळाली होती.तर सुभाष धोटे यांना ६९ हजार ८२८ मते मिळाली होती.काही महिन्यातच अनेक मतदार जोडल्या गेले.सायंकाळ होताच अचानकपणे मतदानात वाढ झाली.आम्ही पुराव्यानिशी ओरडुन सांगत आहोत की, ‘मत चोरी’ शंभर टक्के झालेली आहे,पण निवडणूक आयोग आमच्या प्रश्नाचे उत्तरच देत नाही. मतदार याद्या बरोबर की चूक हेही सांगत नाही.त्यामुळे ‘मत चोरी’ ही गंभीर समस्या असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.तसेच राजुरा मतदारसंघात ६ हजार ८५० मतदार वाढवल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. आरोपाचे खंडन होणे अपेक्षित आहे,अन्यथा लोकशाही धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!