Tuesday, July 21, 2026
Homeगोंदियाघरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरट्यास देसाईगंज येथून अटक... - २१ लाख रुपयांचा मुद्देमाल...

घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरट्यास देसाईगंज येथून अटक… – २१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरट्यास सोन्याच्या दागिन्यांसह तब्बल एक महिन्यानंतर अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया व तिरोडा पोलिसांना यश आले आहे.चोरट्याकडून २१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.विष्णू खोकण विश्वास वय ३४ वर्षे,रा.अरुणनगर,ता.अर्जुनी- मोरगाव असे या चोरट्याचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, ७ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री आठ ते दहाच्या सुमारास तिरोडा येथील दिलीप बन्सोड यांच्या घरी चोरी झाली होती.दागिने व रोख रक्कम असा एकूण १८ लाख ४७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता.या प्रकरणी तिरोडा पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपासकार्य सुरू केले होते.दरम्यान,उपविभागीय पोलिस अधिकारी साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा गोंदियाचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे तसेच तिरोड्याचे पोलिस निरीक्षक अमित वानखेडे यांच्या नेतृत्वातील पथक आरोपींचा शोध घेत असतांना घटनास्थळावरून प्राप्त सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय माहितीच्या आधारे १० नोव्हेंबर रोजी संशयावरून आरोपी रामन्ना ऊर्फ रामचंद्र पोचन्ना ठाकरे वय ३५ वर्षे,रा.देसाईगंज (वडसा)याला ताब्यात घेतले.
त्याची पोलिसांनी सखोल चौकशी केली असता,त्याने यात मुख्य सूत्रधार अट्टल चोरटा विष्णू खोकण विश्वास असल्याचे सांगितले.या माहितीवरून पथक गेल्या महिनाभरापासून गोंदिया,भंडारा,नागपूर जिल्ह्यात तसेच तेलंगणा,छत्तीसगड राज्यात शोध घेत होते.अखेर अट्टल चोरटा विष्णू विश्वास याला देसाईगंज (वडसा)येथून बुधवारी ४ डिसेंबरला ताब्यात घेऊन अटक केली.
त्याच्याकडून एकूण चार नग सोन्याचे बिस्कीट,एक जुनी पल्सर दुचाकी व आरोपी रामन्ना ठाकरे याच्याकडून नगदी २४ हजार ५०० रुपये असा एकूण २१ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे,अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या निर्देशान्वये तिरोडाचे उपविभागीय पोलिस अधिकारी साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक मसराम,वनिता सायकर, श्रेणी पोलिस उपनिरीक्षक गोपाल कापगते,पोलिस अंमलदार तुलसीदास लुटे,इंद्रजित बिसेन,संतोष केदार,तिरोडा येथील पोलिस हवालदार दीपक खांडेकर,खराबे,ठाकरे गायकवाड तसेच तांत्रिक सेल गोंदियाचे सहायक पोलिस निरीक्षक ओमप्रकाश गेडाम,पोलिस अंमलदार संजू मारवाडे,योगेश रहिले, रोशन येरणे यांनी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

इंडिया स्किल्स स्पर्धेसाठी नोंदणी सुरू; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्य सिद्ध करण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमांतर्गत आयोजित 'इंडिया स्किल्स'(IndiaSkills) आणि 'वर्ल्ड स्किल्स'(WorldSkills) स्पर्धांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून,त्या-त्या जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या...

मन सुन्न करणारी घटना..! जन्मदातीने दहा महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेतला अन् मृतदेह खांद्यावर घेऊन पोहचली ठाण्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-सोलापूर जिल्ह्यातून मन सुन्न करणारी घटना आज सोमवारी सर्वत्र उघडकीस आली. एका २६ वर्षीय जनमदात्या आईने स्वतःच्या दहा महिन्याच्या पोटच्या लेकीला संपवून...

कोणताही पात्र बांधकाम कामगार योजनांपासून वंचित राहू नये.. -प्रत्येक ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर विशेष जनजागृती मोहीम राबवा- आमदार रामदास मसराम

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई अंतर्गत जिल्हा कामगार सुविधा केंद्र,गडचिरोली यांच्या वतीने आज,सोमवार २० जुलै रोजी देसाईगंज पंचायत समिती...

तब्बल ११७ आपले सरकार सेवा केंद्रांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात ११५ ग्रामपंचायत व दोन नगरपरिषद/नगरपंचायत स्तरावरील एकूण ११७ आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी १५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!