Monday, August 31, 2026
Homeगडचिरोलीघरगुती गॅस सिलेंडरचा वापर हॉटेल,चहा टपऱ्या तसेच रेस्टॉरंट मध्ये…-पुरवठा विभागाचे दुर्लक्ष….

घरगुती गॅस सिलेंडरचा वापर हॉटेल,चहा टपऱ्या तसेच रेस्टॉरंट मध्ये…-पुरवठा विभागाचे दुर्लक्ष….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- शहरासोबत ग्रामीण भागातही हॉटेल,चहा टपऱ्या, रेस्टॉरंट आदी ठिकाणी तसेच वाहनांत सर्रास घरगुती वापराचे गॅस सिलिंडर वापरले जात आहेत.विशेष म्हणजे रहदारीच्या ठिकाणी उघड्यावर सिलिंडर वापरले जात आहेत. त्यामुळे अनुचित घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित यंत्रणेकडून कारवाई होण्याची गरज आहे.परंतु,धाडसी कारवाया होत नसल्याने व्यावसायिक बिनधास्त असल्याचे दिसून येत आहे.

गडचिरोली शहरातील बाजार,महामार्ग परिसर, बसस्थानकासमोरील परिसरात काही ठिकाणी व्यावसायिक गॅस सिलिंडरचा वापर करतात.गॅस वापरताना त्यांच्याकडून फारसी सुरक्षितता बाळगली जात नाही.त्यामुळे धोका होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.काही वाहनांमध्येही अनधिकृतपणे सिलिंडर वापरले जाते.अनधिकृत सिलिंडर विक्रीही केली जात आहे.

घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरसाठी शासनाच्यावतीने सवलती दिल्या जातात.त्यामुळे व्यावसायिक सिलिंडरच्या तुलनेत घरगुती गॅस सिलिंडरचे दर कमी असतात.त्याचाच गैरफायदा व्यावसायिकांकडून घेतला जात आहे.पुरवठा विभागाने यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.परंतु, कारवाई होत नसल्याने त्यांचे फावत आहे.व्यावसायिक खुलेआम घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या मोहर्ली बिटातील १५४ कक्ष क्रमांकात...

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!