Monday, August 31, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता ऑनलाईन व्यवहार जोमात; नागरिक झाले स्मार्ट…-अनेक दुकानात क्युआर कोड ची चलती…

आता ऑनलाईन व्यवहार जोमात; नागरिक झाले स्मार्ट…-अनेक दुकानात क्युआर कोड ची चलती…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- इलेक्ट्रॉनिक साधने बाजारात उपलब्ध तर झालीच सोबतच ग्रामीण भागात विविध कंपनीचे भ्रमणध्वनी मनोरे उभे झाले असून सेवा सुरू झाली आहे.त्यामुळे शहरी भागातील डिजिटल रुपया आता ग्रामीण भागातही चांगलाच स्थिरावला आहे.आता पैसे खिशात ठेवून दुकानात जाण्याची मूळीच गरज नाही. त्यामुळे गेल्या दोन,तीन वर्षांपासून ग्रामीण भागातही ऑनलाइन व्यवहार जोरात सुरू आहे.

पूर्वीच्या तुलनेत सध्या ऑनलाइन व्यवहारावरच सर्वाधिक भर दिला जात आहे.त्यामुळे सध्या रोखीचे व्यवहार कमी झाले आहेत.संसारोपयोगी महागाचे साहित्य, विविध साहित्यांपासून अगदीच दहा, वीस रुपयांना मिळणारी वस्तू, खाद्यपदार्थ विकत घ्यायचे असले तरी ‘क्यूआर कोड’ स्कॅन करून पेमेंट केले जात आहे. रोखीने होणाऱ्या व्यवहाराचे प्रमाण 

जेमतेम असून आता खिशात नव्हे तर बँकेच्या खात्यात पैसा असायला हवे, अशी अवस्था निर्माण झाली आहे. ग्राहकांच्या खिशात पैसे नसले तरी त्यांच्या बँक खात्यात पैसे असणे आवश्यक आहे. त्यामुळे मोबाइलच्या माध्यमातून ऑनलाइन पेमेंट करता येते. आता पेट्रोलपंप, किराणा दुकान, कपडे खरेदी, सोने खरेदी आदी विविध दुकानात डिजिटल पेमेंट करताना ग्राहक दिसून येत आहेत.तसेच वीजबिलही मोठ्या संख्येने ऑनलाइन केले जात असून नागरिक स्मार्ट झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.सुरवातीच्या काळात प्रशासकीय पातळीवरून युद्ध स्तरावर जनजागृती करण्यात आली. नागरिकांनाही त्याचे महत्त्व पटले असून सध्या रोखीच्या व्यवहाराचे प्रमाण झपाट्याने कमी झाले असून डिजिटल पेमेंटला प्राधान्य दिले जात आहे. मात्र, नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करताना खबरदारी घेणे आवश्यक आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या मोहर्ली बिटातील १५४ कक्ष क्रमांकात...

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!