Thursday, May 28, 2026
Homeकोंढाळाग्रामपंचायत कोंढाळा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत कार्यशाळा संपन्न..

ग्रामपंचायत कोंढाळा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत कार्यशाळा संपन्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोंढाळा(गडचिरोली):-राज्य शासन गावांच्या विकासासाठी विविध योजना राबवत आहे.सदरच्या योजना नागरिकांपर्यंत पोहचाव्यात तसेच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सरपंचांना महत्त्वपूर्ण काम करण्याची संधी उपलब्ध व्हावी,यासाठी राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे.मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कालावधीत आवास योजनेतील उद्दिष्टे पूर्ण करणे, ग्रामस्वच्छता,सुंदर शाळा उभारणी,महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे,सौर ऊर्जेचा वापर,महिला बचतगटांचे सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांमध्ये ठोस कामगिरी करण्यावर भर दिला दिला जाणार आहे.त्यानुसार देसाईगंज तालुक्याच्या ग्रामपंचायत कोंढाळा येथे नुकतीच ग्रामपंचायतीच्या सरपंचा अपर्णा नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत  कार्यशाळा पार पडली.कार्यशाळेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची संकल्पना व गावविकासातील विविध योजनांची माहिती विशद करून तळागाळातील नागरिकांना लाभ देण्याचे ठरविण्यात आले.त्यासाठी येत्या,बुधवार १७ सप्टेंबर रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली असून अभियान यशस्वी करण्याचा संकल्प घेण्यात आला.
कार्यशाळेत नोडल अधिकारी प्राची उके पंचायत समिती देसाईगंज, ग्रामपंचायतीचे उपसरपंच गजानन सेलोटे, ग्रामपंचायतीचे सदस्य,शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, तलाठी,कृषी सहाय्यक,आरोग्य कर्मचारी,आशाताई, अंगणवाडी सेविका,मदतनीस,पोलीस पाटील,उमेद महिला ग्राम संघाचे सर्व सखी,माविम महिला बचत गटाचे प्रतिनिधी,महिला बचत गटाचे अध्यक्ष,सचिव,रोजगार सेवक,ग्रामपंचायत कर्मचारी उमेदचे कर्मचारी प्रशांत मंडपे,वनरक्षक तथा गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन ग्रामपंचायत लिपिक प्रदीप तुपट यांनी केले तर आभार ग्रामपंचायत अधिकारी मेघना राऊत यांनी मानले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतातील विहिरीत पडलेल्या वाघाच्या बछड्याला जीवदान..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यातील लोहारा शिवारात पांढर तलाव परिसरातील एका शेतातील विहिरीत वाघाचा बछडा पडल्याची वार्ता पसरताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत...

दहा वर्षांपेक्षा जास्तकाळ कार्यरत असलेल्या इतर अनेक अभियंत्यांची यादी उपलब्ध असतांना केवळ मलाच लक्ष्य केले जाते.. – कोरचीतील नाडेकल पुलाशी संबंध नसल्याचा कार्यकारी अभियंता...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामात भ्रष्टाचार,अनियमितता तसेच नाडेकल पुलाच्या बांधकामासंदर्भात माध्यमातून प्रसिद्ध आरोप निराधार असल्याचा खुलासा सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक-२ चे कार्यकारी...

चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गृहप्रवेशाच्या पत्रिका देण्यासाठी निघालेल्या तरुणावर वाटेतच काळाने झडप घालून मृत्यूने गाठल्याची घटना आज,गुरुवार २८ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान धानोरा...

पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा शेतशिवारात आढळला मृतदेह.. – वाघाच्या अफवेने वनविभागासह पोलिस यंत्रणेची मोठी धावपळ..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-घरच्यांना दवाखान्यात जात असल्याचे सांगून गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा चक्क शेतशिवारात मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली.पण,मृतदेहावरील खुणा पाहून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!