Monday, August 24, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तगॅस एजन्सीधारकांकडून ग्राहकांची लूट- प्रति गॅस सिलेंडरवर अतिरिक्त वसुली

गॅस एजन्सीधारकांकडून ग्राहकांची लूट- प्रति गॅस सिलेंडरवर अतिरिक्त वसुली

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- गॅसचे दर गगणाला भिडले असतांना सर्वसामान्य नागरिकांना गॅस सिलिंडर भरणे कठिण होऊन बसले आहे.अशातच गॅस एजन्सीधारकांकडून गॅस खरेदी करणाऱ्या ग्राहकांकडून प्रति सिलेंडरवर २० ते २५ रुपये अतिरीक्त वसुली करून लूटमार सुरू आहे. 

याबाबत ग्राहकांकडून फारशा तक्रारी प्राप्त होत नसल्याने गॅस एजन्सीधारकांचा अतिरिक्त वसुलीचा प्रकार सर्रास शहरी भागा बरोबरच ग्रामीण भागात निदर्शनास येत आहे.एका घरगुती गॅस सिलिंडरची किंमत रुपये- ११६८/- असून काही गॅस एजन्सीधारक ग्राहकांकडून १२००/- रुपये घेत आहेत तर काही आपल्याच मनमर्जिने रक्कम घेतांना दिसून येत आहेत.एखाद्या सुजाण नागरिकाने गॅस पासबुक वरती रकमेची नोंद करून मागल्यास कमी रकमेची नोंद करून जास्त रक्कम वसूल केली जात असल्याचा हल्ली प्रकार दिसून येत आहे.अशातच काही ठिकाणी डिलिव्हरी बॉय अधिकचे पैसे घेत असतात.गॅस एजन्सीमधून निघणाऱ्या सिलिंडरच्या बिलातच घरापर्यंत पोहोचविण्याचे भाडे समाविष्ट राहते.एखाद्या ग्राहकाचे गाव शहरापासून जास्त दूर असेल तर तेवढे अधिक भाडे घेतले जाते.मात्र, ही सर्व बाब बिलामध्ये अंतर्भूत राहते.मात्र, गॅसएजन्सीच्या डिलिव्हरी बॉयकडून ग्राहकांना प्रतिसिलिंडर १० ते २० रुपये आगाऊचे वसूल केल्या जाते आधीच सिलिंडरच्या दराने हजारी पार केला आहे.त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे बजेट पूर्णतः कोलमडले आहे.अशातच संबंधित गॅस एजन्सी सिलिंडर सुविधेतील दरापेक्षा अतिरिक्त रक्कम ग्राहकांना मोजावी लागत आहे. त्यामुळे घरगुती गॅस धारकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशा वादनाचा नवा विश्वविक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  उपस्थितीत आज,रविवार २३ ऑगस्ट रोजी नागपूरच्या रेशिमबाग मैदान येथील आयोजित 'मंथन फॉर युवा' (जेनझी संवाद)कार्यक्रमात ढोल-ताशा...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे दोन मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात दोन दिवसांपासून अधून-मधून पावसाची संततधार सुरू आहे.पावसामुळे काही ठिकाणची नाले पाण्याने भरभरून वाहू लागले आहेत. अश्यातच काही नाल्यांवरील पुल ठेंगणे...

शेतावर गेला ‘तो’ घरी परतलाच नाही; आज सापडला मृतदेह.. – कोंढाळा येथील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-शेतावर धानपिकाला खत मारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा दुसऱ्या दिवशी चक्क मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना ही देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा...

देसाईगंज ठाणेदारांची सट्टा-पट्टी व्यवसायावर धाड; ११ जण गजाआड.. – दुचाकी वाहनांसह साहित्य नेले उचलून..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहरातील मुख्य बाजारपेठेसह तालुक्यातील विविध गावात सट्टा-पट्टी व्यवसायाला मोठे उधाण आल्याची बाब उघडकीस येताच नव्याने रुजु झालेले देसाईगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!