Thursday, August 27, 2026
Homeगोंदियागाव करे ते राव न करे'..! राहशील गावात तर येशील डावात... अखेर...

गाव करे ते राव न करे’..! राहशील गावात तर येशील डावात… अखेर गर्भवती मृत्यू प्रकरणी डॉक्टरसह कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-कुठल्याही कार्यालयातील अधिकारी वा कर्मचारी हा साहेब नसतोच,तो जनतेचा सेवक असतो.जिल्ह्याचा कलेक्टर असो वा जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी असो,हे जनतेच्या सेवेसाठीच त्या खुर्चीवर बसलेले असतात.प्रत्येक कार्यालयात बसून काम करणारे हे जनतेचे सेवक तर शासनाचे नोकर आहेत.अशातही अनेकजण स्वतःला अधिकारी भासवून गोर-गरीब,सर्वसामान्य नागरिकांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन मनमर्जी कारभार करीत असतात.मात्र,हल्ली सर्वत्र चित्र बदलू लागले आहेत; आता ‘गाव करे ते राव न करे’..! व ‘राहशील गावात तर येशील डावात’…असा प्रत्यय गोंदिया जिल्ह्यात उघडकीस आला आहे.
नुकताच गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कोरंबीटोला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे प्रसूती दरम्यान एका गर्भवतीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी ३ डिसेंबर रोजी घडली होती.गर्भवती महिलेच्या मृत्यूस प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर व कर्मचारी दोषी असल्याचा ठपका ठेवत गावकऱ्यांनी बुधवारी प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर ठिय्या आंदोलन केले.गावकऱ्यांचा रोष पाहून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ.दिनेश बारसागडे यांची व इतर कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली केली आहे.
कोरंबीटोला येथील वसंता धनराज नेताम या गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी मंगळवारी सकाळी १०:३० वाजता गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आशा सेविकेच्या मदतीने दाखल केले होते.मात्र सकाळी दाखल करण्यात आलेल्या या गर्भवती महिलेवर दुपारी ४ वाजेपर्यंत कुठलाही उपचार करण्यात आला नाही.प्रकृती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येतात कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांनी पीएचसीच्या रुग्णवाहिकेने ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथे दाखल केले होते; पण तिथून सुध्दा गर्भवतीला सायंकाळच्या सुमारास गोंदियाला रेफर करण्यात आले.गोंदियाला नेत असतांनाच वाटेतच गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूची वार्ता गावात पसरली.यानंतर समस्त गावकऱ्यांनी रात्रीच कोरंबीटोला प्राथमिक आरोग्य केंद्रावर धडक देत रोष व्यक्त करीत दोषी डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी लावून धरली.
मंगळवारच्या रात्री आठ वाजता गर्भवती महिलेचा मृत्यू झाला.तिचे पार्थिव गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ठेवण्यात आला होता. बुधवारी सकाळपासून संतप्त लोकांचा जमाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जमा झाला.दोषी डॉक्टरवर कारवाई करा,ही मागणी लावून धरली. जोपर्यंत कारवाई केली जात नाही.तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही; अशी भूमिका कुटुंबीय व गावकऱ्यांनी घेतली होती.त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाईचे लेखी आश्वासन दिले.जिल्हा परिषद
मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम यांनी कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ.दिनेश बारसागडे यांचे बदलीचे आदेश ४ डिसेंबर रोजी काढून त्यांचे स्थानांतर तिरोडा तालुक्यातील वडेगाव प्राथमिक आरोग्य केले.तालुका आरोग्य अधिकारी सुकन्या कांबळे यांनी अधिनस्त असलेल्या पीएससीच्या कर्मचाऱ्यांवर केली. डॉ.आर्या वैद्य ह्या कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा देत आहेत.त्यांचा सेवा समाप्ती कार्यकाळ १८ डिसेंबरपर्यंत आहे.त्यांचे सुध्दा स्थानांतरण केले.आरोग्य सेविका म्हणून कार्यरत असलेल्या सोनाली राऊत यांची बदली अरुणनगर येथे तर परिचर उमेश बोरकर यांची महागाव येथे बदली केली.प्राथमिक आरोग्य केंद्राची जबाबदारी सांभाळण्यासाठी धाबेपवनी येथे कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ.आनंद पाटील हे रुजू झाले हे कोरंबीटोला येथे रुजू झाले.त्यांना सहकार्यासाठी सीएचओची सात दिवसासाठी नियुक्त्ती करण्यात आली आहे.परिचर म्हणून वामन मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!