गोंदिया :-३८ वर्षीय तरुणाचे १८ वर्षीय तरुणीवर वीट भट्टीवर काम करीत असतांना प्रेम-प्रकरण सुरू झाले.प्रेम-प्रकरण बहरून आल्याने तरुणी गर्भवती राहिली.गर्भवती राहिल्याने लग्न करून सुखी संसाराची स्वप्ने रंगवू लागली.त्यामुळे तरुणीने तरुणाकडे लग्नाचा तगादा लावला.लग्नाचा तगादा लावताच तरुणाने तिच्यापासून कायमची सुटका व्हावी,यासाठी त्याने तरूणीचा गळा आवळून खून केला.त्यानंतर तिची ओळख पटू नये,यासाठी तिच्या अंगावर चादर व तनस टाकून जाळले.गोरेगाव तालुक्यातील देऊटोला-बबई गावालगत असलेल्या कालव्याजवळ सोमवारी १० फेब्रुवारीला सकाळी सात वाजताच्या सुमारास पौर्णिमा विनोद नागवंशी वय १८ वर्षे,रा.मानेकसा या मुलीचा जळलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला.सुरुवातीला तिची ओळख पटली नव्हती; परंतु पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून तिची ओळख पटविली.अशातच मृत पौर्णिमा विनोद नागवंशी ही आठ महिन्यांची गर्भवती होती.आरोपीने तिला आमिष दाखवीत तिच्यावर अत्याचार केला; परंतु तिने लग्नाचा अट्टहास करताच तिचा गळा आवळून खून केला.नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने तिच्या तोंडावर व शरीरावर चादर व तणीस टाकून तिला जाळून टाकले.ती आठ महिन्यांची गर्भवती असल्याचे उत्तरीय तपासात पुढे आले आहे. प्रकरणी आरोपी शकील मुस्तफा सिद्दीकी वय ३८ वर्षे,रा.मामा चौक,गोविंदपुर रोड,गोंदिया याला न्यायालयाने १७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
गळा आवळून खून प्रकरणातील तरुणी आठ महिन्यांची गर्भवती.. – आरोपीस १७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

