Monday, October 5, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली नाट्यश्री कविता स्पर्धेतील ५० व्या सत्रात संगीता रामटेके व किशोर बोरकुटे...

गडचिरोली नाट्यश्री कविता स्पर्धेतील ५० व्या सत्रात संगीता रामटेके व किशोर बोरकुटे विजयी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच’ गडचिरोलीच्या वतीने “आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता” हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.या कवितेला “आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी” म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते.या उपक्रमाचे ५० वे व शेवटचे सत्र नुकतेच पार पडले असून यात ४१ कवींनी सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून स्पर्धेचे हे ५० वे सत्र असल्याने यावेळी दोन कवींना सन्मानित करण्यात आले आहे. त्यात गडचिरोली जिल्ह्यातील संगीता रामटेके व चंद्रपूर जिल्ह्यातील किशोर बोरकुटे या दोन कवींनी बाजी मारली आहे.
सुप्रसिध्द कवयित्री संगीता रामटेके रा.आरमोरी, जि.गडचिरोली व नवोदित कवी किशोर बोरकुटे रा.कवठी,ता.सावली,जि.चंद्रपूर या दोन कवींची आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून निवड करण्यात आली असून,त्यांच्या अनुक्रमे “भक्तीभाव” व “बाप” या कवितांची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे.असे नाट्यश्रीचे संचालक तथा नाटककार चुडाराम बल्हारपुरे व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.
संगीता रामटेके ह्या सुप्रसिध्द कवी असून त्यांचे वेदनेचे काहूर,ह्रदयातील भाव व काव्य संगीता हे तीन काव्यसंग्रह प्रकाशित असून दोन काव्यसंग्रह प्रकाशनाचे मार्गावर आहेत.तर किशोर बोरकुटे हे नवोदित कवी असून त्यांनी नुकतीच कविता लेखनास सुरुवात केलेली आहे.नुकत्याच नाट्यश्रीच्या वतीने प्रकाशित ‘रानगर्भातील रानफुले’ या कविता संग्रहात त्यांच्या दोन कविता समाविष्ट आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्रीचे दादा चुधरी,दिलीप मेश्राम,प्रा.यादव गहाणे व प्रा.अरुण बुरे तसेच नाट्यश्रीच्या सदस्यांनी दोघांचेही अभिनंदन केले आहे.
५० व्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने प्रा.पंढरी बनसोडे, तुळशीराम उंदीरवाडे,संतोष कपाले,माधुरी अमृतकर, संगीता ठलाल,उकंडराव नारायण राऊत,गजानन गेडाम,वंदना सोरते,रोहिणी पराडकर,अजय राऊत, पुनाजी कोटरंगे, प्रियंका ठाकरे,पी.डी.काटकर,विलास टिकले,कु.विधी बन्सोड,अतुल के.गंडाटे,वामनदादा गेडाम,जयराम धोंगडे,मुर्लीधर खोटेले,मंदाकिनी चरडे, सुभाष धाराशिवकर,डॉ.मंदा पडवेकर,विलास जेंगठे,यामिनी मडावी,कु.भावना रामटेके,सुरज गोरंतवार,किशोर बोरकुटे,रंजना चुधरी,राजेंद्र यादवराव सोनटक्के,संगीता रामटेके,ज्योती म्हस्के,लता शेंद्रे, रेखा दिक्षित,सुरज गेडाम,मिलींद बी.खोब्रागडे,मधुकर दुफारे,ज्योत्स्ना बन्सोड,सुजाता अवचट,सुनिल चडगुलवार,खुशाल म्हशाखेत्री,शैला चिमड्यालवार  इत्यादी कविंनी सहभाग नोंदविला होता.
पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार असल्याचे नाट्यश्रीचे संचालक तथा नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नितेश कराळे मास्तरांनी नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भरला उमेदवारी अर्ज..

उद्रेक न्युज वृत्त :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक,सामाजिक कार्यकर्ते तथा विदर्भातील वऱ्हाडी भाषेत स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करणारे शिक्षक म्हणून प्रसिद्ध असलेले कराळे मास्तर अर्थात नितेश...

मतदार यादी पुनरीक्षण; आता बीएलओ घरी जाऊन स्वीकारणार नोटीस प्राप्त मतदारांची कागदपत्रे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जुळवणी न झालेल्या किंवा जुळवणीत तार्किक विसंगती असलेल्या मतदारांना सुनावणीची नोटीस प्राप्त झाली असली,तरी निवडणूक...

बँकांनी कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना तगादा लावून नये; जीवाचे बरे वाईट केल्यास यंत्रणेला जबाबदार धरले जाईल- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने सरकारकडून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पीक कर्जवसुलीपासून दिलासा देण्यात आला आहे.अश्यातच काही बँका,पतसंस्था वा इतर वित्तसंस्था शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी...

लोखंडी पाईपांच्या आड गांजाची तस्करी; तिघांना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-लोखंडी पाईपांच्या आड लपवून आणलेला तब्बल ५०० किलो गांजाचा साठा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने(एनसीबी)नागपुरात जप्त केला.हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील स्कायलाइन ढाब्याजवळ पहाटेच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!