Wednesday, May 13, 2026
Homeगडचिरोलीगोशाळांकरीता प्रतीदिन प्रती गोवंश ५० रुपये अनुदान.. - गोशाळांकरीता अनुदान हवे तर...

गोशाळांकरीता प्रतीदिन प्रती गोवंश ५० रुपये अनुदान.. – गोशाळांकरीता अनुदान हवे तर ३१ डिसेंबर पर्यंत करा अर्ज..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील गोशाळांना आर्थीकदृष्टया सक्षम करण्याकरीता २०२४-२५ पासुन गोशाळेत ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींना प्रतीदिन प्रती गोवंश ५० रुपये शासनाकडून अनुदान देण्यात येणार आहे. सदर योजना राबवीण्यास शासनाने मान्यता दिली आहे.या योजनेअंतर्गत अनुदानाच्या पात्रतेच्या अटीनुसार जिल्ह्यातील गोसंगोपनाचा किमान ३ वर्ष अनुभव असलेल्या,गोशाळेत किमान ५० गोवंश व संस्थेतील ईअर टॅगींग (भारत पशुधन प्रणालीवर) असलेले गोसेवा आयोगाकडील नोंदणीकृत गोशाळा, गोसदन,पांजरापोळ व गोरक्षण संस्थेमधील देशी गाई अनुदानास पात्र आहेत.त्या करीता ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत आहे.सदर योजनेचे उद्देश व स्वरुप, अनुदान पात्रतेच्या अटी व शर्ती,योजनेची अंमबजावणी तसेच योजनेचा ऑनलाईन अर्ज व त्यासोबत जोडावयाची अनुषंगीक कागदपत्रे इ.सवीस्तर माहीती www.mahagosevaayog.org व http://schemes.mahagosevaayog.org  या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारणे १६ डिसेंबर २०२४  ते ३१ डिसेंबर २०२४,गोसेवा आयोग मार्फत प्राप्त अर्जाची प्राथमीक तपासणी ०१ जानेवारी २०२५ ते १० जानेवारी २०२५,जिल्हा गोशाळा पडताळणी समीतीव्दारा प्राथमीक तपासणी अंती पात्र गोशाळांची प्रत्यक्ष भेट व पडताळणी ११ जानेवारी २०२५ ते २० जानेवारी २०२५,जिल्हा गोशाळा पडताळणी समीती अहवालानुसार अनुदानास पात्र गोधनांची संख्या आयोग कार्यालयास कळवीणे २१ जानेवारी २०२५ ते २५ जानेवारी २०२५ पर्यंत.जिल्हयातील ईच्छुक गोशाळा यांनी वर दिलेल्या वेळापत्रकानुसार ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन  डॉ.विलास अ.गाडगे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त गचिरोली यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उपराजधानीत मध्य भारतातील सर्वात उंच भगवान बजरंगबलीच्या मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात मध्य भारतातील सर्वात उंच भगवान बजरंगबलीची(हनुमान)विराट आणि भव्य-दिव्य अशी मूर्ती तयार करण्यात येत असून नागपूरच्या कोराडी...

रोजगार हमीचा तांत्रिक सहाय्यक सात हजारासाठी अडकला एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहीरीचे बांधकाम पुर्ण झाल्याने झालेल्या कामाच्या उर्वरीत अनुदानाची रक्कम काढण्यासाठी शाखा अभियंता व उप अभियंता यांची...

महिन्याला १८ हजार ५०० रुपये वेतन; फील्ड ऑफिसर पदांसाठी भरती.. – मुलाखतीद्वारे होणार निवड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच नोकरी देणारे व नोकरी शोधणारे यांना एकाच व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास,रोजगार...

मन सुन्न करणारी घटना..! पहिल्यांदा पत्नीची गळा चिरून हत्या व नंतर पतीनेही घेतला गळफास..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यात मन सुन्न करणारी घटना आज,मंगळवार १२ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.पहिल्यांदा पतीने ३५ वर्षीय पत्नीचा गळा चिरून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!