Thursday, August 6, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्हा परिषदेंतर्गत रद्द झालेल्या पदभरतीचे परिक्षा शुल्क मिळणार परत…-उमेदवारांनी माहिती अद्यावत...

गडचिरोली जिल्हा परिषदेंतर्गत रद्द झालेल्या पदभरतीचे परिक्षा शुल्क मिळणार परत…-उमेदवारांनी माहिती अद्यावत करण्याच्या सूचना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- जिल्हा परिषद अंतर्गत मार्च-२०१९ व ऑगस्ट-२०२१ मधील गट-क व आरोग्य विभागाच्या पदभरतीची संपूर्ण प्रक्रिया ग्राम विकास विभागाचे शासन निर्णय दिनांक- २१ ऑक्टोबर २०२२ अन्वये रद्द करण्यात आली आहे.या पदभरतीच्या जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या उमेदवारांचे परिक्षा शुल्क परत करण्याच्या अनुषंगाने https://maharddzp.com या संकेतस्थळावर लिंक उमेदवारांसाठी दि.५ सप्टेंबर २०२३ पासुन सुरु करण्यात आली आहे.उमेदवारांनी सदर संकेतस्थळावर आवश्यक माहिती भरावी.त्या अनुषंगाने परिक्षा शुल्क त्यांचे बँक खात्यावर परत करण्यात येईल.ज्या उमेदवारांनी यापुर्वी माहिती भरलेली आहे.अशा उमेदवारांनी स्वत:चे बँक खाते क्रमांक नमुद करुन माहिती अद्यावत करावी. 

उमेदवारांनी चुकीची माहिती भरल्यामुळे परिक्षा शुल्क त्यांचे बँक खात्यावर परत न झाल्यास जिल्हा परिषद, जबाबदार राहणार नाही.तसेच याबाबत उमेदवारांकडुन प्राप्त कोणतीही तक्रार ग्राह्य धरण्यात येणार नाही; याची उमेदवारांनी नोंद घ्यावी; असे जिल्हा परिषद पदभरती निवड समितीचे सदस्य सचिव तथा सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर शेलार यांनी कळविले आहे. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पत्नीच्या डोळ्यादेखत वाघाचा हल्ला; पती ठार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातून एक धक्कादायक घटना आज,गुरुवार ६ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.दावेझरी गाव नजीकच्या चुल्हारडोह-आग्री जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी...

प्राप्त तक्रारींची दखल; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर पातागुडम-सोमनपल्ली महामार्गाच्या दुरुस्तीला गती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेबाबत नागरिकांकडून सातत्याने प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या निर्देशानंतर राष्ट्रीय महामार्ग...

सरकारने सरसकट थकबाकी द्यावी; अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन.. – कंत्राटदार आक्रमक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सरकार केलेल्या कामांची थकबाकी देत नाही; पण नवीन कामे करवून घेत आहे.अश्यातच राज्यभरात विविध विभागातील कामांच्या सुमारे ९० हजार कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे त्रस्त...

देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा,कोरची व इतर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांच्या बदल्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांसह उपपोलिस ठाणे व पोलिस मदत केंद्रांतील तब्बल ७२ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.या संदर्भात काल बुधवारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!