Tuesday, October 27, 2026
Homeनागपूरखोट्या कागदपत्रांच्या आधारे मिळविलेले जन्म-मृत्यूंचे दाखले होणार रद्द.. - विशिष्ट शहरे आणि...

खोट्या कागदपत्रांच्या आधारे मिळविलेले जन्म-मृत्यूंचे दाखले होणार रद्द.. – विशिष्ट शहरे आणि तालुके रडारवर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपुर :-ज्यांच्या जन्माची किंवा मृत्यूची कुठेही नोंद नाही; अश्यांच्या जन्म आणि मृत्यूची नोंद असलेले दाखले काही कालावधीपासून महसूल विभागाकडून वितरीत करण्यात आले.मात्र,काही ठिकाणी खोटी कागदपत्रे व केवळ आधार कार्डला पुरावा मानून जन्म-मृत्यूचे दाखले दिले गेले आहेत.केवळ आधार कार्डच्या पुराव्यावर दिलेले किंवा संशयास्पद वाटणारे जन्म-मृत्यूचे दाखले आणि नोंदी तात्काळ रद्द करून, पोलिसात तातडीने तक्रार दाखल करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला दिले असून तहसीलदार,उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना सोळा मुद्यांच्या आधारे जन्म-मृत्यू दाखल्याची तपासणी करावी,असे सुचविण्यात आले आहे.अतिरिक्त मुख्य सचिव गृह तसेच अतिरिक्त मुख्य सचिव महसूल यांच्या उच्चस्तरीय बैठकीतील सूचनानंतर महसूल मंत्री बावनकुळे यांनी हे आदेश दिले.११ ऑगस्ट २०२३ च्या सुधारणेनंतर नायब तहसीलदारांनी वितरीत केलेले जन्म-मृत्यू नोंदीचे आदेश परत घेण्याचे आणि रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अश्यातच अवैध जन्म-मृत्यू प्रकरणांमध्ये राज्यातील काही विशिष्ट शहरे आणि तालुके रडारवर असून यात अमरावती,सिल्लोड, अकोला,संभाजीनगर शहर,लातूर,अंजनगाव सुर्जी, अचलपूर,पुसद,परभणी,बीड,गेवराई, जालना,अर्धापूर आणि परळी या ठिकाणांचा समावेश आहे.येथील तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांना ही प्रकरणे गांभीर्याने तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.त्याचबरोबर, अर्जातील माहिती आणि आधार कार्डवरील जन्मतारीख यामध्ये तफावत आढळल्यास संबंधित व्यक्तीवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.तसेच,जे लाभार्थी मूळ प्रमाणपत्र परत करणार नाहीत किंवा जे आता सापडत नाहीत,त्यांची यादी बनवून त्यांना ‘फरार’ घोषित करण्याची प्रक्रिया आणि त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्याची स्थानिक पोलिसांनी करावी,असे म्हटले आहे.विशेष म्हणजे,जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांच्या देखरेखीखाली विशेष मोहीम राबवून विशेष मेळाव्याद्वारे या कामाचा निपटारा केला जावा,असेही बजावण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चित्तथरारक घटना..! दोन वाघांची दुचाकीवर झडप; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यातून एक चित्तथरारक घटना समोर आली आहे.रात्रीच्या अंधारात जंगलमार्गे दुचाकीने गावाकडे परतणाऱ्या तरुणाच्या दुचाकीवर दोन वाघांनी झडप घालून तरुणाला ठार केल्याची घटना...

उद्याला गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट; मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह विजांच्या कडकडाटाची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने  उद्या,बुधवार २८ ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.तर चंद्रपूर, गोंदिया,नागपूर,वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये...

२७ वर्षीय तरुणाने गळफास घेत संपवली जीवनयात्रा; आज सकाळची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या नगर परिषद हद्दीत येणाऱ्या नैनपूर येथील एका २७ वर्षीय तरुणाने घरी कुणीही नसतांना स्वतःच्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना...

नागपूर पदवीधर मतदारसंघात कोण मारणार बाजी? राजकीय वर्तुळात उत्सुकता..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल आज,मंगळवार २७ ऑक्टोंबरला जाहीर होणार असून अभिजीत वंजारी वर्सेस सुधाकर कोहळे यांच्यापैकी कोण बाजी मारणार,याबाबत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!