Wednesday, June 10, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा येथे श्रद्धेय पाणी वापर संस्थेच्या वतीने स्वामी विवेकानंद सार्वजनिक अभ्यासिकेचा शुभारंभ..

कोंढाळा येथे श्रद्धेय पाणी वापर संस्थेच्या वतीने स्वामी विवेकानंद सार्वजनिक अभ्यासिकेचा शुभारंभ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथे भाजपाचे देसाईगंज तालुकाध्यक्ष सुनील पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली आज,रविवार १२ जानेवारीला स्वामी विवेकानंद जयंती दिनाचे प्रित्यर्थ श्रद्धेय पाणी वापर संस्था पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्वामी विवेकानंद सार्वजनिक अभ्यासिकेचा शुभारंभ करण्यात आला.
गावातील होतकरू विद्यार्थ्यांना अभ्यासाची सवय जडवी तसेच युवकांचा स्पर्धा परीक्षेविषयी कल वाढून मोठ्या हुद्द्यावर उंच भरारी घेत गावाचे नाव पंचक्रोशीत गुंजावे,यासाठी आज बुद्धिमत्तेचे अथांग सागर असलेल्या स्वामी विवेकानंद जयंती दिनाचे औचित्य साधून श्रद्धेय पाणी वापर संस्थेच्या वतीने स्वामी विवेकानंद सार्वजनिक अभ्यासिकेची सुरुवात करण्यात आली आहे.सध्याच्या काळात स्पर्धा परीक्षा आणि त्याच्या डिजिटल अभ्यासासाठी विद्यार्थी तसेच युवकांकडून फार महत्व दिले जात आहे; मात्र, त्यासाठी लागणाऱ्या सोयी सुविधा व जागा हे सर्वसामान्य मुलांना सहज परवडणारे नाही.यासाठी गावातील तरुणांना सदरची सुविधा मिळावी,या उद्देशाने स्वामी विवेकानंद सार्वजनिक अभ्यासिका उपलब्ध करून देण्यात आली असल्याने याचा लाभ होतकरू विद्यार्थ्यांनी घ्यावे; असे प्रतिपादन भाजपाचे देसाईगंज तालुकाध्यक्ष सुनील पारधी यांनी आज अभ्यासिकेचे शुभारंभ प्रसंगी केले.
सुरू करण्यात आलेली अभ्यासिका ही शालेय विद्यार्थी तसेच युवकांसाठी असून २४ तास उपलब्ध असणार आहे.अभ्यासिकेच्या शुभारंभ पूर्वी बुद्धिमत्तेचे अथांग सागर स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस श्रद्धेय पाणी वापर संस्थेचे पदाधिकारी तथा उपस्थित मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन करुन, माल्यार्पण करण्यात आले.त्यानंतर स्वामी विवेकानंद यांच्या जिवणपटलावर प्रकाश टाकून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.अभासिकेच्या शुभारंभ प्रसंगी भाजपाचे देसाईगंज तालुकाध्यक्ष सुनील पारधी, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे भाजप विस्तरक रोशन ठाकरे,श्रद्धेय पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष आनंदराव बेदरे,सचिव ज्ञानेश्वर चौधरी,सदस्य नरेश ढोंगे,दिगांबर भजनकर,प्रतिष्ठित नागरिक प्रभाकर चौधरी,पत्रकार नितेश पाटील,पदाधिकारी नंदकिशोर ढोरे,वासुदेव ठाकरे,आशिष दोनाडकर,नंदकिशोर बेहरे,मदन पचारे,ज्ञानेश्वर मेश्राम,सार्थक कसारे,योगेश गुरूनुले,आदित्य राऊत,मयंक शेंडे,मंथन ठाकरे,कुणाल रायशीडाम, मोहित दुपारे,भूषण बगमारे, कृष्णा कुमरे,सुमित तुपट,साहील बेदरे,ईशांत तुपट सह गावातील शालेय विद्यार्थी तसेच युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना झटका.. आता नऊ सिलेंडरवर नाही; तर चारच सिलेंडरवर मिळणार अनुदान..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात रविवार ७ जून २०२६ पासून २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार, बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतींनी...

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आधार पडताळणी करणे आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक शेतकरी गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती,अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतमालाला न मिळणारा योग्य भाव,यामुळे आर्थिक संकटाचा सामना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!