Thursday, April 30, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा येथे रिझर्व बँक ऑफ इंडिया व फॉर्मर प्रोड्युसर कंपनी तर्फे वृक्षारोपण...

कोंढाळा येथे रिझर्व बँक ऑफ इंडिया व फॉर्मर प्रोड्युसर कंपनी तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कोंढाळा(देसाईगंज):-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथे ६ ऑगस्ट रोजी रिझर्व बँक ऑफ इंडिया,गडचिरोली स्मार्ट कक्ष,आत्मा व देसाईगंज फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड कोंढाळा यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील दत्त मंदिर परिसर तसेच इतर ठिकाणी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम  घेण्यात आला.

वृक्ष लागवड कार्यक्रम प्रसंगी गावातील मुख्य दत्तमंदिर परिसरातील आवारात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फळझाडे लावण्यात आली. त्याचप्रमाणे उपस्थित शेतकरी उत्पादक कंपनीच्या सभासदांना फळझाडांचे वाटप करण्यात आले.प्रसंगी रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या वतीने आर्थिक साक्षरता या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमास आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांची प्रमुख उपस्थिती होती.गजबे यांनी ‘एक पेड मॉ के नाम’ याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास प्रज्ञा गोडघाटे विभागीय नोडल अधिकारी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय नागपूर, बसवराज मास्तोळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गडचिरोली, अर्चना कोचरे नोडल अधिकारी स्मार्ट कक्ष गडचिरोली,उपविभागीय कृषी अधिकारी परांजपे, सर्वेश आरबीआय नागपूर,सौरभ आरबीआय नागपूर,  खंडाळे तालुका कृषी अधिकारी वडसा,बलराम बलगमवार मूल्य साखळी विकास तज्ञ नागपूर,गौरव डेहनकर पर्यावरण तज्ञ नागपूर,भूषण देशमुख कृषी पर्यवेक्षक वडसा,विनोद राहंगले आत्मा वडसा तसेच देसाईगंज शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष सुनील पारधी,संचालक मेघनाथ दुनेदार,चेतनदास विधाते, कैलास पारधी,विकास पारधी,प्रमोद बेदरे,अनिता शेंडे, लता बघमारे,सरिता आत्राम तथा संपूर्ण संचालक मंडळ,कर्मचारी व मोठ्या संख्येने सभासद व गावकरी उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!