Sunday, August 23, 2026
Homeगडचिरोलीमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे संकेतस्थळ झाले सुरू…-अर्जात त्रुटी असणाऱ्यांनी तात्काळ त्रुटीची...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे संकेतस्थळ झाले सुरू…-अर्जात त्रुटी असणाऱ्यांनी तात्काळ त्रुटीची पुर्तता  करावी…-रक्षाबंधना पूर्वी ३ हजार रुपये होणार जमा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वाकांक्षी योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात आजपर्यंत ऑनलाईन प्राप्त झालेल्या एकूण १ लाख ५६ हजार २६७ अर्जापैकी १ लाख ५५ हजार ९२८ अर्जांची पडताळणी करण्यात आली असून हे प्रमाण ९९.८ टक्के आहे.तर मंजूर करण्यात आलेल्या अर्जाची संख्या १ लाख ५० हजार १८५ इतकी आहे.राज्य शासनाने या योजने अंतर्गत अर्ज भरण्याची प्रक्रिया गतीमान करण्यासाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in/signup हे संकेत स्थळ सुरु केले असून या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक महिलांनी अर्ज भरण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी केले आहे.

अर्ज पडताळणी प्रक्रियेत त्रुटी पुर्ततेसाठी ज्या महिलांना मोबाईवर संदेश प्राप्त झाले आहेत; त्यांनी त्रुटीची पुर्तता तात्काळ करावी; रक्षाबंधना पूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे ३ हजार रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत.ज्या महिलांनी अर्जातील त्रुटींची पूर्तता केली नाही; अशांना रक्कम मिळण्यास विलंब होऊ शकतो.त्यामुळे तात्काळ त्रुटींची पूर्तता करणे गरजेचे आहे.

यादी अंतिम करण्यसाठी विधानसभानिहाय समिती गठीत👇

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज पडताळणी करून पात्र यादी अंतिम करण्यासाठी विधानसभा मतदार संघनिहाय संबंधीत मतदार संघाचे आमदार यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी संजय दैने यांनी निर्गमित केले आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचित केलेल्या अशासकीय सदस्यांची निवड या समितीमध्ये करण्यात आली आहे. 

विधानसभानिहाय समिती👇

अहेरी विधानसभा मतदार संघ क्षेत्र👇

अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम (अध्यक्ष),रवी ओल्लेवार,विनोद आकलपल्लीवार हे अशासकीय सदस्य तर अहेरी,एटापल्ली,सिरोंचा, भामरागड व मुलचेरा तालुक्याचे चे सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी,मुख्याधिकारी हे सदस्य आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) हे सचिव/समन्वयक म्हणून काम पाहतील.

गडचिरोली विधानसभा मतदार संघ👇

आमदार डॉ.देवराव होळी (अध्यक्ष),प्रशांत वाघधरे, संगीता हिंगे हे अशासकीय सदस्य तर गडचिरोली, चामोर्शी व धानोरा चे सर्व तहसिलदार,गटविकास अधिकारी,मुख्याधिकारी हे सदस्य आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) हे सचिव/समन्वयक म्हणून काम पाहतील.

आरमोरी विधानसभा मतदार संघ क्षेत्र👇

आमदार कृष्णा गजबे (अध्यक्ष),किसन नागदेवे, चांगदेव फाये हे अशासकीय सदस्य तर आरमोरी, देसाईगंज,कुरखेडा व कोरची तालुक्याचे सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी,मुख्याधिकारी सदस्य व बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) हे सचिव/समन्वयक म्हणून काम पाहतील.

यानुसार समितीमार्फत आजपर्यंत गडचिरोली विधानसभा मतदार क्षेत्रातून प्राप्त ६० हजार ६८० अर्जापैकी ५९ हजार ६६० अर्ज मंजूर करण्यात आले आहे.तसेच आरमोरी क्षेत्रातून ५६ हजार ३०७ पैकी ५४ हजार ९२१ आणि अहेरी मतदार संघातून ३९ हजार २८० प्राप्त अर्जापैकी ३५ हजार ६०४ अर्ज मंजूर करण्यात आले आहे.समितीमार्फत पात्र लाभार्थींची यादी अंतिम करण्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी यांचेमार्फत सदर अर्ज मंजूर करून राज्य शासनाकडे पाठविण्यात आले आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशा वादनाचा नवा विश्वविक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  उपस्थितीत आज,रविवार २३ ऑगस्ट रोजी नागपूरच्या रेशिमबाग मैदान येथील आयोजित 'मंथन फॉर युवा' (जेनझी संवाद)कार्यक्रमात ढोल-ताशा...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे दोन मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात दोन दिवसांपासून अधून-मधून पावसाची संततधार सुरू आहे.पावसामुळे काही ठिकाणची नाले पाण्याने भरभरून वाहू लागले आहेत. अश्यातच काही नाल्यांवरील पुल ठेंगणे...

शेतावर गेला ‘तो’ घरी परतलाच नाही; आज सापडला मृतदेह.. – कोंढाळा येथील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-शेतावर धानपिकाला खत मारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा दुसऱ्या दिवशी चक्क मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना ही देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा...

देसाईगंज ठाणेदारांची सट्टा-पट्टी व्यवसायावर धाड; ११ जण गजाआड.. – दुचाकी वाहनांसह साहित्य नेले उचलून..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहरातील मुख्य बाजारपेठेसह तालुक्यातील विविध गावात सट्टा-पट्टी व्यवसायाला मोठे उधाण आल्याची बाब उघडकीस येताच नव्याने रुजु झालेले देसाईगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!