Tuesday, July 28, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने मतदार जनजागृती अभियान...

कोंढाळा येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने मतदार जनजागृती अभियान…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंज शहरातील मोहसीनभाई जव्हेरी महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने विशेष मतदार जनजागृती अभियान देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथे राबवण्यात आला.मतदार जनजागृती अभियानास ग्रामपंचायतीच्या सरपंचा अर्पणा राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गावकऱ्यांना मतदानाचे महत्व सांगून जनजागृती करण्यात आली.तसेच रासेयो स्वयंसेवकांनी घरोघरी जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला आणि मतदानाच्या महत्वाबाबत जनजागृती केली.लोकांना मतदान प्रक्रियेची माहिती देत मतदान हक्काचा योग्य वापर करण्याचे आवाहान करण्यात आले.मतदान हे लोकशाहीचे महत्वाचे अंग आहे आणि प्रत्येक नागरिकाने त्याचा योग्य वापर केला पाहीजे; असे स्वयंसेवकांनी स्पष्ट केले.प्रसंगी मतदान प्रक्रियेचे वर्णन करीत मतदान हे केवळ हक्क नाही तर आपले आद्य कर्तव्य आहे.मतदान हे प्रत्येक देशाच्या विकासात महत्वाचे योगदान देते.उपस्थित ग्रामस्थांनी उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत आगामी निवडणुकीत मतदान करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाच्या निमित्याने महाविद्यालयाच्या परिसरात रासेयो स्वयंसेवकांनी एकत्र येऊन मतदानाची शपथ घेतली.स्वयसेवकांली “मी प्रामाणिकपणे आणि निष्पक्षपणे माझा मतदान हक्क वाजावीन” अशी शपथ घेतली.प्रसंगी संस्थाध्यक्ष जैनुद्दीन जव्हेरी यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.सदर कार्यक्रमाचे आयोजक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.आशिष सेलोकर यांच्या नेतृत्वाखाली करण्याव आले.त्यांनी मतदार जागरूकतेचे महत्व विषद केले आणि विद्यार्थ्यांना समाजसेवेसाठी प्रात्साहित केले.मतदार जागरूकता अभियान हे विद्यार्थ्यांसाठी एक सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण करणारे पाऊल ठरले असल्याचे मत व्यक्त केले.अभियानास महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!