Wednesday, July 29, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा येथे नळाच्या पाण्यात नारुसदृश्य जंतू…-नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर..

कोंढाळा येथे नळाच्या पाण्यात नारुसदृश्य जंतू…-नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कोंढाळा(देसाईगंज) :- देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा गावातील इंदिरा आवास नगर(टोली)च्या वार्ड क्रमांक-४ येथे आज सकाळी ७.१५ वाजेच्या दरम्यान नळाच्या पाण्यातून एक ते दीड फूट लांबीचा नारुसदृश्य जंतू आढळून आल्याने ग्रामपंचायत प्रशासनाद्वारे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर टांगला जातो आहे.

कोंढाळा ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने संपूर्ण गावामध्ये नळाच्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो.अशातच बऱ्याच वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी वाटर फिल्टर मशीन लावण्यात आली आहे.मात्र आज दिनांक- २३ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास वार्ड क्रमांक- ४ येथील रहिवासी चंद्रहास ढोरे यांच्या घरी महिला वर्ग पिण्याचे पाणी भरीत असतांना नारुसदृश्य जंतू आढळून आला आहे.सदर नळाच्या पाण्यातून निघालेला नारुसदृश्य जंतू एक ते दीड फूट लांबीचा असून बारीक सुताच्या आकाराचा आहे.नागरिकांच्या मते,यापूर्वीही अनेकवेळा नारुसदृश्य जंतू पाण्यात आढळून आल्याने याबाबत ग्रामपंचायत प्रशासनास माहिती देण्यात आली आहे.मात्र याकडे कानाडोळा करण्यात येत असल्याने कोंढाळा ग्रामवासीय जनतेचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे सदर प्रकारावरून दिसून येत आहे.नारुसदृश्य जंतू पाण्यातून निघत असतील तर पाणी साठवणूक विहीर व जलकुंभ यातील नियमित साफसफाई करण्यात येते काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.पाणी पुरवठा करणाऱ्या नळ योजनेकडे आरोग्य विभागानेही लक्ष देण्याची गरज आहे.वारंवार पाण्यातून नारू निघणे धोकादायक असून ग्रामपंचायत प्रशासनाने कानाडोळा न करता; याकडे लक्ष देण्याची मागणी गावातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तुकाराम मुंढेंनी शाळा व्यवस्थापनावर सोपवली मोठी जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विविध निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचे सत्र सुरू असतांनाच आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...

माझा वाढदिवस-एक झाड उपक्रम; देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि वृक्षारोपणाची सवय प्रत्येकामध्ये रुजावी या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,देसाईगंज येथे "माझा वाढदिवस-एक झाड" हा...

राज्यांतर्गत पिकस्पर्धा; आता शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने...

राज्य सरकार म्हणतेय; गौण खनिजांच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर दहापट दंड आकारू.. -चोर खरोखरच चोऱ्या करणे सोडणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-गौण खनिजांची चोरी करणे ही काही चोरट्यांसाठी नित्याचीच बाब झाली आहे.काहींना अवैध रेती,मुरूम,दगड,माती व इतर गौण खनिजांची चोरी केल्याशिवाय चैनच पडेनासे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!