Wednesday, June 17, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा येथे दोन दिवसांपासून बिबट्याची दहशत; दोन शेळ्यांचा पाडला फडशा..

कोंढाळा येथे दोन दिवसांपासून बिबट्याची दहशत; दोन शेळ्यांचा पाडला फडशा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोंढाळा(गडचिरोली):-गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घालत एकाच दिवशी दोन शेळ्यांचा फडशा पाडून दहशत माजवली आहे.बिबट्या एवढ्यावरच थांबला नाही,तर परत दुसऱ्या दिवशीही शिकारीच्या शोधात भटकंती करून गावनजिक आल्याने गावकरी भयभीत झाले आहेत.सदरची घटना देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा गावातील इंदिरानगर येथे नुकतीच उघडकीस आली आहे.अनिल मेश्राम वय ३५ वर्षे, रा.कोंढाळा,ता.देसाईगंज,जि.गडचिरोली असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार,कोंढाळा येथील शेतकरी अनिल मेश्राम यांनी गुरुवार,३० एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे घरालगत असलेल्या गोठ्यात शेळ्या बांधून ठेवल्या होत्या.सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने परिसरातील नागरिक गप्पा मारत असतांनाच गुरुवारच्या रात्री अकरा वाजेच्या दरम्यान जंगल परिसरातून आलेल्या बिबट्याने गोठ्यातील एका शेळीला उचलून नेले व जवळच असलेल्या शेतात ठेवून काही भाग फस्त केला.दरम्यान,काही वेळाने परत बिबट्या गोठ्यातील एका शेळीला पकडुन उचलून नेणार तोच शेळीचा जोरात ओरडण्याचा आवाज ऐकून गप्पा मारत बसलेल्या कुटुंबीयांनी गोठ्याकडे धाव घेताच बिबट्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.यात बिबट्याने शेळीच्या मानेला पकडल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती परिसरात होताच नागरिकांनी आरडाओरड करून परिसरात पाहणी केली असता नजीकच्या शेतात एका शेळीला ठार केल्याचे दिसून आले.प्रकरणी घटनेची माहिती मिळताच देसाईगंज वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परत दुसऱ्या दिवशी म्हणजेच काल शुक्रवारच्या सायंकाळी बिबट्याने गावात शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच बिबट्याला पिटाळून लावले.सलग दोन दिवस बिबट्याने धुमाकूळ घातल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.विशेष म्हणजे, इंदिरानगर परिसरातील नागरिक तसेच लहान चिमुकले सायंकाळच्या वेळेस काही कामानिमित्त घराबाहेर पडतात.अश्यातच एखादी अनुचित घटना घडू नये, यासाठी वन विभागाने बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यास नुकसानभरपाई देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.त्याचबरोबर, बिबट्यावर पाळत ठेवण्यासाठी परिसरात गस्त वाढविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार विभागाचे राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १८ जून...

डाटा एन्ट्री ऑपरेटरकडे चार हजार रुपये द्यायला सांगताच एसीबीची धाड; दोघेजण अडकले जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-मालमत्तेची नोंदणी करण्यासाठी गेलेल्या तक्रारदारास दुय्यम निबंधक कार्यालयातील दोन मालमत्तांच्या रजीस्ट्रीचे चार हजार रुपये लागतील,असे सांगून ते पैसे डाटा एन्ट्री ऑपरेटरकडे...

अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली; ‘या’ तारखेला येणार पीएम किसानचे दोन हजार खात्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी(PM-KISAN)योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दिला जाणारा २३ वा हप्ता हा येत्या,शनिवार २० जून २०२६ रोजी वितरित...

आता एमआरपीपेक्षा अधिक दराने खते विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासह परवाना रद्द करण्याची कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे,खते व कीटकनाशके वेळेत आणि योग्य दरात उपलब्ध व्हावीत,तसेच बोगस बियाणे विक्री,साठेबाजी आणि जादा दराने खतविक्रीच्या प्रकारांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!