Thursday, July 30, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा येथे 'जागतिक योग दिन' मोठ्या उत्साहात साजरा…

कोंढाळा येथे ‘जागतिक योग दिन’ मोठ्या उत्साहात साजरा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कोंढाळा(देसाईगंज) :- जागतिक योग दिनाचे औचित्य साधून आज,दिनांक -२१ जून रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथील ग्रामपंचायत आवारात ‘जागतिक योग दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कोंढाळा येथील ग्रामपंचायत आवारात आज सकाळी  योग शिक्षक प्रभाकर गडपायले यांनी दररोज योगा केल्याने शरीरावर सकारात्मक परिणाम होतो.शरीर आणि मन शांत करण्यासाठी योगा खूप फायदेशीर मानला जातो.योगा केल्याने शरीराला ऊर्जा मिळते,स्नायूंची ताकद वाढते.तसेच यामुळे श्वसन,ऊर्जा आणि चैतन्य सुधारते.२१ जून रोजीचा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वात मोठा दिवस असतो.त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे.म्हणून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून सर्वत्र मोठ्या जय्यत तयारीनिशी साजरा करण्यात येतो.त्यामुळे ‘करा योग राहा निरोग’ असे योगा प्रसंगी सांगितल्या गेले व विविध प्रकारचे योगा करून जागतिक योग दिन साजरा करण्यात आला.

योग दिन प्रसंगी ग्रामपंचायत सरपंचा अपर्णा नितीन राऊत,योग शिक्षक प्रभाकर गडपायले,जी.प.शाळेचे शिक्षक योगेश ढोरे सर, गावातील पोलीस पाटील किरणताई कुंभलवार,आरोग्यवर्धिनी उपकेंद्रचे कुथे मॅडम,ग्रामपंचायत कर्मचारी प्रदीप तुपट,अजय भर्रे, माजी सरपंचा मंगला शेंडे,अनिता शेंडे,अंगणवाडी सेविका, मदतनीस,गावातील आशा वर्कर,आरोग्य उपकेंद्राचे कर्मचारी तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा  दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील मालेगाव टाऊन परिसरात आज,गुरुवार ३० जुलै रोजी सकाळच्या...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे २५ मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नुकतेच दोन दिवसांपूर्वी नागपूरच्या  प्रादेशिक हवामान खात्याने गडचिरोली जिल्ह्यासाठी काल,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट,तर आज गुरुवारसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्यानुसार,जिल्ह्याच्या...

लाखो रुपयांचा विदेशी दारूसाठा जप्त; कार ठेवून पळाला आरोपी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अवैधरीत्या दारूची वाहतूक करणाऱ्या कारचा पाठलाग करण्यात आला.दरम्यान,चालकाने पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न केला खरी,पण त्याचा प्रयत्न...

ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी; …अन्यथा एसटी बसची मिळणारी सवलत होणार बंद..!

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड(NCMC)अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार,येत्या शनिवार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!