Wednesday, June 10, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा येथील देसाईगंज शेतकरी उत्पादक कंपनीची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न...

कोंढाळा येथील देसाईगंज शेतकरी उत्पादक कंपनीची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंज फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड कोंढाळाची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा काल,बुधवार दिनांक-२५ सप्टेंबरला कोंढाळा येथील कंपनीच्या कार्यालयामध्ये आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.देसाईगंज शेतकरी उत्पादक कंपनीच्या अध्यक्षस्थानी कंपनीचे अध्यक्ष सुनील पारधी हे होते.सभेत कंपनीच्या वार्षिक अहवाल पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.त्याचप्रमाणे कंपनीच्या मयत सभासदांच्या वारसांना शाल व साडी देऊन सन्मान करण्यात आला.तसेच एनसीटी कोढे मॉडल एस आर आय पद्धतीनुसार उत्कृष्ट धान लागवड केल्याबद्दल सभासद विनोद ठेंगरे यांचाही सत्कार करण्यात आला.
कंपनीच्या कार्यक्षेत्रा अंतर्गत दहा गावातील ८०० कंपनी शेअरधारक शेतकरी बांधव उपस्थित होते.
सभेचे संचालन चैतनदास विधाते तर जमाखर्च कोणार्क बोनगिलवार सीईओ यांनी वाचन करून दाखविले.आभार कंपनीचे संचालक मेघनाथ दूनेदार यांनी मानले.सभा संपल्यानंतर लगेचच सर्व सभासदांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.
सभेला आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे,नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक पौनीकर,
देसाईगंज तालुका कृषी अधिकारी खंडाळे,एनसीटी महेश,गडचिरोली आत्मा नोडल अधिकारी कोचरे, माजी महिला व बालकल्याण सभापती रोशनीताई पारधी,आत्माचे बीटीएम रहांगडाले,देसाईगंज महाराष्ट्र बँक शाखेचे शाखा प्रबंधक,ग्रीन गोंडवाना कंपनीचे अध्यक्ष प्रशांत दर्वे,कंपनीचे सदस्य,संचालक व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना झटका.. आता नऊ सिलेंडरवर नाही; तर चारच सिलेंडरवर मिळणार अनुदान..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात रविवार ७ जून २०२६ पासून २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार, बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतींनी...

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आधार पडताळणी करणे आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक शेतकरी गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती,अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतमालाला न मिळणारा योग्य भाव,यामुळे आर्थिक संकटाचा सामना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!