- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र,भिसी येथे सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेच्या माध्यमातून २८ सप्टेंबर रोजी कुष्ठांतेयांची सभा आयोजित करण्यात आली.वैद्यकीय अधिकारी डॉ.गिरीपुंजे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. सभेला चिमूर तालुक्यातील एकूण ३१ कुष्ठांतेय उपस्थित होते.त्यामधून ११ सदस्यीय कार्यकारिणी गठीत करण्यात आली.या कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला सूतमाला व पुष्प अर्पण करून करण्यात आली. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत संस्थेचा अहवाल व माहिती पुस्तिका देऊन करण्यात आले.यावेळी उपस्थित कुष्ठांतेयांना सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेची स्थापना,कार्य व उद्दिष्टांविषयी माहिती देण्यात आली. संस्थेची गरज तसेच संघटन बांधणी याबाबत मिलिंद बारसिंगे यांनी प्रास्ताविकातून मार्गदर्शन केले.
कुष्ठांतेयांनी स्वतःहून पुढे येऊन कुष्ठरोगाविषयी कोणतीही भीती न बाळगता स्वाभिमानाने व प्रतिष्ठेने जीवन जगावे.तसेच कुष्ठांतेयांनी एकत्रित येऊन आपल्या समस्या सोडविण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून संघटितपणे काम करण्याची गरज आहे,असे मार्गदर्शन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.गिरीपुंजे यांनी केले.सभेत उपस्थित संस्थेच्या सदस्यांनी आपापले मनोगत व्यक्त केले.यावेळी कुष्ठरोगामुळे निर्माण झालेल्या विविध समस्यांचे कथन करण्यात आले.या समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा संकल्प करण्यात आला.यानंतर सर्वांच्या उपस्थितीत चिमूर तालुका स्तरावर ११ सदस्यीय समिती गठित करण्यात आली.समितीतील अध्यक्षपदी कल्पना शंभरकर,उपाध्यक्षपदी गौतम वासनिक,सचिवपदी अश्विनी मसराम,सहसचिवपदी भूषण सोनवाने आणि कोषाध्यक्षपदी मनोहर शेंडें यांची निवड करण्यात आली.तसेच सदस्य म्हणून सहादेव गौरकार,दर्शना दडमल,संजय लाकडे,शामराव समर्थ,सुनील देव्हारे, सारिका काडे आणि नागदेवता जुळे यांची एकमताने निवड करण्यात आली.
या सभेला निमवैद्यकीय अधिकारी त्रिपुरवार,आरोग्य सहाय्यक निखाडे व धानके,आरोग्य सेवक सतीश ढोक, पॅरामेडिकल वर्कर कविता आसुटकर,अलर्ट इंडिया संस्थेचे नयन शेंदरे व कविता रामटेके,तसेच सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेच्या विद्या कांबळे, श्रावण हांडेकर,मिलिंद बारसिंगे आणि प्राथमिक आरोग्य केंद्र भिसी येथील सर्व आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कविता रामटेके व श्रावण हांडेकर यांनी अथक परिश्रम घेतले.
- Advertisement -

