- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहरात ईद-ए- मिलादुन्नबी (पैगम्बर जयंती) निमित्त काल,१६ सप्टेंबरला यंग मुस्लिम जश्ने ईद मिलादुन्नबी कमेटीच्या पूढाकाराने भव्य मिरवणुकीसह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळच्या सुमारास सुन्नी जामा मस्जिद येथे मुस्लिम बांधव एकत्र येत विविध देखावे व पैगम्बर मोहम्मद यांचे गुणगान करीत भव्य मिरवणूक काढण्यात आली.सदर मिरवणूक मस्जिद चौक येथून मार्गक्रमण करीत आझाद चौक,आंबेडकर चौक,फव्वारा चौक,बाजार पेठ,हनुमान मंदिर,कूंभीटोला रोड,राणा प्रताप वार्ड मार्गे पुन्हा जामा मस्जिद येथे पोहचत विसर्जित करण्यात आली.मिरवणूकीत मक्का मदिना येथील देखावे व शिस्तबद्ध मार्गक्रमण करणारे भाविक हे वैशिष्टे होते.येथे समाजाचे ज्येष्ठ सदस्य,एसटी महामंडळाचे सेवानिवृत्त लिपीक रफीक शेख यांचा हस्ते धार्मिक ध्वजारोहण करण्यात आले.तसेच नूकतेच पवित्र हज यात्रा पूर्ण करीत आलेले मुस्लिम समाजाचे अध्यक्ष मसूद शेख तसेच मस्जीदचे इमाम व मोहज्ज़म यांचा शाल श्रीफळ देत सत्कार करण्यात आला.यानंतर बाजारपेठ व उपजिल्हा रूग्णालय कूरखेडा येथे अन्न दान करण्यात आले.तत्पूर्वी रविवारच्या रात्री आझाद चौक येथे जलसाचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमात मस्जिद कमेटीचे मसूद शेख,बबलू हूसैनी,अमानूल्लाह खान,नवाब हाशमी,सलीम खाणानी,बब्बू मस्तान, मूर्तूजा शेख,अयूब खान,मकसूद खान,सईद शेख, आबिद शेख,शफीऊल्लाह खान, तसेच यंग मुस्लिम कमेटीचे अध्यक्ष न्याज़ सय्यद उपाध्यक्ष तौकीर शेख, सचिव कासीद कूरेशी आसिफ शेख,ऊसमान खान,शादाब खान,बिलाल खाणानी साजीद शेख, शमीम शेख,जमील शेख, तौसीफ शेख,असद खान, शहेबाज शेख, मुन्ना शेख, रेहान खान,अयाज सैय्यद, ओमी खान,सोहेल खान, इरशाद अली,फाजील शेख, नवेद शेख,जोहेल खान,हमजा खान,रेहान पठान,रजा खान,राजा शेख तसेच मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थीत होते
- Advertisement -

