Tuesday, May 26, 2026
Homeकुरखेडाकुरखेडा मुस्लिम समाज बांधव मंडळाच्या वतीने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन...

कुरखेडा मुस्लिम समाज बांधव मंडळाच्या वतीने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती आज,सोमवार १४ एप्रिलला मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.अशातच आज
कुरखेडा शहरातील स्थानिक मुस्लिम समाज बांधव मंडळाने एक नवा आदर्श निर्माण करीत शहराच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील विहारात जाऊन भगवान गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर द्विप प्रज्वलन करून माल्यार्पण करीत महामानवास अभिवादन केले.
कुरखेडा शहरात सर्वधर्मीय नागरिक नेहमीच एकमेकांच्या सन-उत्सवात,सुख-दुःखात सहभागी होत असतात.हिच सौहार्दाची भावना वृद्धिंगत करीत शहराची परंपरा कायम राखण्याकरीता मुस्लिम समाज बांधव मंडळाच्या वतीने आज येथील विहाराला भेट देत डॉ.बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.तसेच उपस्थित बौद्ध बांधवांना मुस्लिम समाजाच्या वतीने धार्मिक निळा ध्वज प्रदान करण्यात आला व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत मिठाईचे वितरण करण्यात आले.याप्रसंगी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी मसूद शेख,माजी अध्यक्ष अयुब खान, वलीअहेमद खान,साजीद शेख,आसिफ शेख,रियाज़ शेख,शहेबाज शेख,यूसुफ पठान,सादिक शेख,पत्रकार सिराज पठान,जावेद शेख तसेच मुस्लिम बांधव उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर बदल्यांचे सुलतान तुकाराम मुंढेनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा स्वीकारला पदभार..

उद्रेक न्युज वृत्त मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज,सोमवार २५ मे रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.विशेष...

गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्ण लहरींचा इशारा; आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-हवामान विभाग,प्रादेशिक केंद्र नागपूर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात  काही ठिकाणी उष्ण लहर ते तीव्र उष्ण लहर निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात...

हृदय हेलावणारी घटना..! आधी चार मुलांना विहरीत ढकलले व नंतर वडिलाने स्वतःही केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बुलढाणा :-जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यात हृदय हेलावणारी घटना आज,सोमवार २५ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने समाजमन सुन्न झाले आहे.सातपुडा पर्वत रांगांच्या...

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!