Thursday, June 4, 2026
Homeदेसाईगंजकाय सांगता..? देसाईगंजच्या चोप येथील शेत शिवारात आढळला चक्क सात फुटाचा अजगर..!

काय सांगता..? देसाईगंजच्या चोप येथील शेत शिवारात आढळला चक्क सात फुटाचा अजगर..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या चोप येथील शेत शिवारात आज,सोमवार २६ मे रोजी सकाळच्या चक्क सात फुटाचा अजगर आढळून आल्याने परिसरातील शेतकऱ्यांची काहीकाळ भंबेरी उडाली होती.लागलीच याची माहिती चोप येथील सर्पमित्र तुषार उईके यांना देताच त्यांनी घटनास्थळ गाठत तब्बल सात फूट लांबीच्या अजगर सापाला  कुशलतेने पकडून सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात सोडून जीवनदान दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,चोप येथील काही शेतकरी आज सोमवारी सकाळच्या सुमारास शेत बांधावर कामे करीत असतांना त्यांना जीवन बावणे यांच्या शेतात एक भला मोठा साप दिसून आला.त्यामुळे शेतात कामे करणाऱ्या शेतकऱ्यांची काहीकाळ घाबरगुंडी उडाली.त्यानुसार लागलीच गावातील सर्प मित्र तुषार उईके व दीपक पंडेल यांना पाचारण करण्यात आले.तुषार उईके यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेत मोठ्या कौशल्याने सात फूट लांबीच्या अजगर सापाला पकडले व काही वेळातच त्याला नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले.भल्या मोठ्या सापाची बातमी गावात पसरताच घटनास्थळी काहीकाळ बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.
  • शंभरहून अधिक सापांना जीवनदान👇
चोप येथील सर्पमित्र तुषार उईके हे गेल्या अनेक वर्षांपासून सर्पमित्र म्हणून कार्यरत आहेत.सापांना पकडून त्यांना जीवदान देण्याचे कार्य ते सातत्याने करत आहेत.त्यांनी आतापर्यंत जवळपास शंभरहून अधिक सापांना जीवनदान दिले आहे.ज्यात अनेक विषारी आणि बिनविषारी सापांचा समावेश आहे. सर्पमित्र तुषार उईके यांचे हे कार्य खरोखरच वाखाणण्याजोगे आहे.ते केवळ सापांना जीवनदान देत नाहीत,तर मानवी वस्तीत साप शिरल्यास होणारा धोकाही टाळतात आणि वन्यजीव संरक्षणात मोलाची भर घालतात.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अन्न व औषध प्रशासन विभागाचा छापा; मोठा औषध साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-कोणत्याही वैज्ञानिक आधाराशिवाय खोटे दावे करणे आणि जाहिरात करून औषध विकणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा असूनही काहीजण आक्षेपार्ह जाहिराती तसेच निकृष्ट दर्जाची...

अल्पवयीन मुलांची प्रेयसीची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-दोन अल्पवयीन मुलांनी चक्क प्रेयसींची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आल्याने पोलिसही चक्रावून गेल्याची घटना...

जिल्हास्तरीय युवा पुरस्कार २०२५-२६ साठी प्रस्ताव स्वीकारण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे यांच्या वतीने राज्याचे युवा धोरण २०१२ अन्वये जिल्हास्तरीय युवा पुरस्कार सन २०२५-२६ साठी पात्र...

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!