- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-गरजू आणि गोर-गरीब राशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी असून आता शासनाने नवी योजना आणली आहे.सदरची योजना ही पुढील महिन्याच्या १ जून पासून सुरू होणार आहे.या योजने अंतर्गत रेशनकार्डधारकांना धान्यासह दरमहा १ हजार रुपये दिले जाणार आहेत.विशेषतः ज्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, अश्यांना याचा लाभ दिला जाणार आहे.या योजनेचा उद्देश केवळ गरीब कुटुंबांना मोफत राशन देणे नाही तर,गरीब आणि गरजू कुटुंबांना आर्थिक मदत करणे असा आहे.या योजनेचा लाभ फक्त त्या लोकांनाच मिळेल,जे सरकारने ठरवून दिलेल्या निकषांची पूर्तता करतील.सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा वेबसाइटला भेट द्यावी लागेल.अर्ज करण्यासाठी राशन कार्ड,आधार कार्ड,बँक पासबुकची प्रत, उत्पन्नाचा दाखला,रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम,राज्य अन्न आणि नागरी पुरवठा वेबसाइटला भेट द्या.त्यानंतर रेशन कार्ड नवीन योजना २०२५ या पर्यायावर क्लिक करा. रेशन कार्ड क्रमांक आणि इतर तपशील भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.यानंतर अर्ज सबमिट करा.मात्र, सदर योजनेचा लाभ हा सरकारने ठरवून दिलेल्या निकषांची पूर्तता करणाऱ्यांसाठीच आहे.
- Advertisement -

