Friday, September 4, 2026
Homeगडचिरोलीभात,तूर,मूंग आणि उडीद या पिकांचे बियाणे हवेय तर महाडीबीटी पोर्टलवर करा अर्ज..

भात,तूर,मूंग आणि उडीद या पिकांचे बियाणे हवेय तर महाडीबीटी पोर्टलवर करा अर्ज..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण सुरक्षा अभियान अंतर्गत खरीप हंगाम २०२५-२६ करिता राज्य शासनाच्या ‘महाडीबीटी पोर्टल’ वरील ‘शेतकरी योजना’ अंतर्गत शेतकऱ्यांना पीक प्रमाणपत्र व प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ देण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून सदर अर्ज बुधवार २८ मे २०२५ पर्यंत पोर्टलवर ऑनलाईन भरता येतील.
कृषी विभागामार्फत गडचिरोली जिल्ह्यातील विविध तालुक्यांत राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान (अन्नधान्य पीक)अंतर्गत भात,तूर,मूंग आणि उडीद या पिकांचे बियाणे शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार असून त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज अनिवार्य आहे.
महत्त्वाच्या सूचना👇
अर्ज प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य (FCFS) तत्वावर स्वीकारले जातील.
अर्जदार शेतकऱ्यांचे MAHADBT पोर्टलवर नोंदणी आवश्यक आहे.
शेतकऱ्यांचे नाव ३१ मार्च २०२४ पूर्वी ७/१२ उताऱ्यावर असणे आवश्यक आहे.
आर्थिक सहाय्य फक्त भात,तूर व मूग या पिकांसाठी प्रमाणित बियाणे वितरण घटकातच मर्यादित आहे.
अर्ज भरतांना बियाणे उत्पादक कंपन्यांकडून प्रमाणपत्र व पीक प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
शासनाच्या निर्देशानुसार,शेतकऱ्यांनी आपली संपूर्ण माहिती आणि आवश्यक कागदपत्रांसह महाडीबीटी पोर्टलवरील https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin या संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावा.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज भरावा,असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रीती हिरळकर यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!