Tuesday, September 22, 2026
Homeगडचिरोलीकाय म्हणता राव !…२५ रुपयांची सलाईन; खाजगी डॉक्टर घेतो ५०० रुपये…-खाजगी डॉक्टरांची...

काय म्हणता राव !…२५ रुपयांची सलाईन; खाजगी डॉक्टर घेतो ५०० रुपये…-खाजगी डॉक्टरांची ‘घरे मस्त तर रुग्णांची घरे उद्ध्वस्त’….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके

गडचिरोली :- पूर्वीचे डॉक्टर म्हटले की,त्यांना देवदूत म्हटले जायचे; कारण की,त्यांच्यासाठी पैका महत्वाचा नव्हता; तर रुग्णांचे प्राण व त्यांचे जीव कसे वाचविता येणार; याकडे संपूर्ण लक्ष केंद्रित करून उत्कृष्ट कार्य करणे हे त्यांचे आद्य कर्तव्य होते.मात्र आजच्या घडीला पूर्वी प्रमाणे जे डॉक्टर कार्य करायचे ते कार्य आज दिसून येत नाही.अशातच वातावरणातील बदलामुळे सध्या स्थितीत अनेकांना सर्दी,ताप, खोकला,हगवण,उलटी,आदी आजार बळावले असल्याचे दिसून येतात.अनेकांना तर सलाईन लावावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.शासकीय रुग्णालयात अगदी मोफत उपलब्ध होणारी सलाइन जर एखाद्या खासगी रुग्णालयात लावल्यास जवळपास पाचशे रुपये मोजावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.साधारणतः मेडिकलमधूनही ती सलाइन घेतो म्हटले तर २५ ते ५० रुपयांपर्यंत तिची किंमत आहे.परंतु,खासगी रुग्णालयात अतिरिक्त दर आकारण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व्हायरल फ्लूची साथ दिसून येत आहे.परिणामी शासकीय सहखासगी रुग्णालये फुल्ल दिसून येत आहेत; परंतु, काही डॉक्टर विनाकारण अधिकची औषधे देऊन लुटत असल्याचे दिसून येत आहे.ग्रामीण भागासह शहरात व्हायरल,ताप,सर्दी, खोकल्याची साथ जोरात सुरु आहे.ऑक्टोबर गर्मी मुळे ही साथ वाढली आहे.

मेडिकल स्टोअर्समध्ये २५ ते ५० रुपयांना सलाइन सहज उपलब्ध होत असते; परंतु, ते लावल्यास ५०० रुपये डॉक्टरांकडून उकळले जातात.तीन प्रकारच्या सलाईन मेडिकल स्टोअर मध्ये अगदी स्वस्तात उपलब्ध असतात.यामध्ये एनएस,आरएल व डीएनएस या तीन प्रकारच्या सलाइन उपलब्ध आहेत.त्यातही स्वस्त दरात मिळणाऱ्या सलाईन अफाट कमाईचे साधन झाले आहे.म्हणूनच खाजगी डॉक्टरांची ‘घरे मस्त तर रुग्णांची घरे उद्ध्वस्त’ होतांना दिसून येत आहेत.तरीही तालुका हेल्थ अधिकारी एवढी चुप्पी कां बरं साधतोय ही नवलाची बाब आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत गणेश मंडळांमध्ये शासकीय योजनांची जनजागृती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना व सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय,गडचिरोलीमार्फत विविध गणेश मंडळांना...

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!