Tuesday, July 14, 2026
Homeबीडकर्ज मागणीच्या तगाद्याला कंटाळून; मुख्याध्यापकाची गळफास घेऊन आत्महत्या

कर्ज मागणीच्या तगाद्याला कंटाळून; मुख्याध्यापकाची गळफास घेऊन आत्महत्या

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

बीड : कर्ज मागणीच्या हप्त्याच्या तगाद्याला कंटाळून जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.ही धक्कादायक घटना बीडच्या धारूर तालुक्यातील आसरडोह शिवारात घडली आहे.नितीन लक्ष्मण पाटोळे वय ३४असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे.

मुख्याध्यापक नितीन पाटोळे यांनी बीडच्या माजलगाव येथील मंगलनाथ मल्टीस्टेटच्या दिंद्रूड शाखेकडून २०१९ मध्‍ये वैयक्तिक कर्ज घेतले होते. सुरूवातीला १० हजार रुपये हप्त्याने कर्जाची परतफेड केली. मात्र कोरोना काळात काही हप्ते थकले.त्यानंतर जून २०२२ रोजीपासून १५ हजार रुपये हप्ता ते भरत होते.तरी देखील मंगलनाथ मल्टीस्टेटचे वसूली पथकातील अधिकाऱ्यांनी कर्जफेडीसाठी तगादा लावला होता.त्यांना सातत्याने त्रास देऊन कारवाईची धमकी देत होते.यामुळे पाटोळे व्यथित होते.यातूनच कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

नितीन पाटोळे यांच्या पश्चात आई- वडील,पत्नी,दोन मुली असा आप्त परिवार असून त्यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

वसतिगृहातील गंभीर अनियमिततेवर आमदार मसराम संतप्त.. – आरमोरी येथील वसतिगृहांची प्रत्यक्ष पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी शहरातील शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहास आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी अचानकपणे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता वसतिगृहातील अनेक...

आज दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल होणार जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज,मंगळवार १४ जुलै रोजी...

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!