- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
बीड :-राज्यात सर्वत्र महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन साजरा होत असतांनाच महिला मजुरांवर काळाने घाला घातल्याची घटना आज,गुरुवार १ मे रोजी बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील धामणगाव परिसरात घडली.कांदा काढणीला पिकअप वाहनात बसून जात असतांना पिकअप वाहनाचे टायर फुटल्याने वाहन उलटून तीन महिला ठार झाल्या तर १५ महिला मजूर जखमी झाल्या.
याबाबत अधिक माहिती अशी की,आज गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे कांदा काढण्यासाठी पिकअप वाहनाने १९ ते २० महिला मजूर जात होत्या.अशातच बीड ते अहिल्यानगर मार्गावरील धामणगाव परिसरात वाहनाचे टायर फुटल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले.त्यामुळे वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. यात घटनेच्यावेळी १९ ते २० मजूर महीलांपैकी ३ महिला जागीच ठार झाल्या तर १५ महिला जखमी झाल्या. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली.बऱ्याच मजूर महिलांना मार लागल्याने एकच रडारड सुरू होती तर जेवणाचे डब्बे व इतर साहित्य रस्त्यावर पडलेले होते.पोलिसांनी तात्काळ जखमी महिलांना लगतच्या रुग्णालयात हलविले.
- Advertisement -

