Saturday, September 12, 2026
Homeगडचिरोलीउल्लेखनीय कार्य करणाऱ्या सहकारी संस्थांना सहकार पुरस्काराकरीता अर्ज करण्याचे आवाहन..

उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सहकारी संस्थांना सहकार पुरस्काराकरीता अर्ज करण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्य शासनाच्या सहकार विभागाकडून २०२१ ते २०२४ या कालावधीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सहकारी संस्थांना गौरविण्यासाठी सहकार पुरस्कार वितरणाचा कालबध्द कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.या पुरस्कारांसाठी इच्छुक संस्थानी १८ जुलैपर्यंत सबंधित तालुका सहाय्यक निबंधक किंवा उपनिबंधक कार्यालयात अर्ज सादर करावेत,असे आवाहन करण्यात आले आहे.या पुरस्कारांतर्गत एकूण ४५ संस्थाना पुरस्कार दिले जाणार आहेत.त्यामध्ये सहकार महर्षी पुरस्कार एक  संस्था १ लाख रुपये,सहकार भुषण पुरस्कार २१ संस्था ५१ हजार रुपये आणि सहकार निष्ठ पुरस्कार २३ संस्था २५ हजार रुपये यांचा समावेश आहे.सर्व पुरस्कारासोबत स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे.संस्थांच्या निवडीसाठी मुल्यांकन निकष ठरविण्यात आले असून नोंदणी,वार्षिक सर्वसाधारण सभा,नफा-तोटा,थकबाकी,कायदेशीर कारवाई, लेखापरिक्षण,दोषदुरुस्ती अहवाल,निवडणूक आदी बाबींना ५० गुण,संस्था प्रकारानुसार विशेष निकषांना ३५ गुण,संस्था प्रकारानुसार विशेष निकषांना ३५ गुण, तर सहकार चळवळ,जनतेसाठी योगदान, सार्वजनिक व धर्मादाय मदत यांना २० गुण देण्यात येणार असल्याचे गडचिरोली जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!