- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :- उमेदचे कंत्राटी कर्मचारी गेल्या बऱ्याच वर्षांपासून राज्य,जिल्हा,तालुका तसेच ग्राम पातळीवर मानधनावर काम करीत आहेत.उमेद म्हणजेच महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान ही केंद्र शासनाची योजना आहे.योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिला सक्षमीकरण व विविध कार्ये कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या मानधनावर करावे लागत असल्याने राज्यातील ८४ लाख ग्रामीण कुटूंबाच्या उज्वल भवितव्यासाठी ७ ऑक्टोंबरपासून मुंबईच्या आझाद मैदानात संघटनेचे आंदोलन सुरु आहे.
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी,कर्मचाऱ्यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरुपी समाविष्ट करु; असे आश्वासन लोकप्रतिनिधींनी मुंबईत दिले.
उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेच्या आंदोलनाला खासदार सुप्रिया सुळे,आमदार
माणिकराव कोकाटे,सुहास कांदे यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.काल,सोमवारी आंदोलनाचा ८ वा दिवस होता.संघटनेचे अध्यक्ष स्वप्निल शिर्के व मार्गदर्शक उपोषणकर्ते प्रभाकर गावडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे.राज्यभरातून बहुसंख्य महिलांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे.
- Advertisement -

