Saturday, August 29, 2026
Homeगडचिरोलीउद्याला हवामान अनुकूल तंत्रज्ञानासाठी 'डिजिटल शेतीशाळा'.. - एकात्मिक कीड व्यवस्थापनावर मिळणार धडे..

उद्याला हवामान अनुकूल तंत्रज्ञानासाठी ‘डिजिटल शेतीशाळा’.. – एकात्मिक कीड व्यवस्थापनावर मिळणार धडे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-बदलत्या हवामानाचा शेतीला बसणारा फटका कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाने सक्षम करण्यासाठी जिल्ह्यात ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २.०’ अंतर्गत डिजिटल शेतीशाळा’ अभियान राबविण्यात येत आहे.या अभियानांतर्गत उद्या,बुधवार १५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७:३० वाजता ‘एकात्मिक कीड व्यवस्थापन’ या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी दिली.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चालविले जाणारे ‘डिजिटल शेतीशाळा’ हे एक ऑनलाईन व्यासपीठ आहे.बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी शेतकऱ्यांना तसेच भूमिहीन कुटुंबांना सक्षम करणे आणि कृषी आधारित उपजीविकेची साधने उपलब्ध करून देऊन शेती किफायतशीर करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.या शेतीशाळेच्या माध्यमातून तज्ज्ञांमार्फत शेतकऱ्यांना शास्त्रोक्त आणि पीकनिहाय उत्तम पद्धतींचे मार्गदर्शन झूम(Zoom) आणि युट्यूब(YouTube)च्या माध्यमातून दिले जाते.
एकात्मिक कीड व्यवस्थापनावर मिळणार धडे👇
उद्या,बुधवार १५ एप्रिल रोजी होणाऱ्या सत्रात ‘भाग-३: एकात्मिक कीड व्यवस्थापन’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.यामध्ये प्रामुख्याने सापळा पिके,पक्षी थांबे,चिकट सापळे,मित्र कीटक, लिंबोळी अर्क आणि दशपर्णी अर्काचा वापर यांसारख्या प्रभावी आणि कमी खर्चाच्या उपाययोजनांची माहिती दिली जाणार आहे.जिल्ह्यातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत हे अभियान गावपातळीवर पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी कुटुंबांनी उद्या सायंकाळी ७:३० वाजता या डिजिटल शेतीशाळेत उपस्थित राहून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा,असे आवाहन गडचिरोली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!