Friday, August 14, 2026
Homeगडचिरोलीउद्याला सर्व ग्रामपंचायतींमध्ये पीएम आवास योजनेच्या अंतिम प्रतीक्षा यादी निश्चितीसाठी ग्रामसभा...

उद्याला सर्व ग्रामपंचायतींमध्ये पीएम आवास योजनेच्या अंतिम प्रतीक्षा यादी निश्चितीसाठी ग्रामसभा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत Awaas+ २०२४ सर्वेक्षणातील लाभार्थ्यांची कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी अंतिम करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये उद्या,१५ ऑगस्ट २०२६ रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहे. नागरिकांनी ग्रामसभेला उपस्थित राहून मसुदा प्रतीक्षा यादीची पडताळणी करावी आणि आवश्यक दुरुस्त्या असल्यास त्या निदर्शनास आणून द्याव्यात,असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे.
या ग्रामसभेत AwaasSoft प्रणालीमधून तयार करण्यात आलेली मसुदा कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी सादर केली जाईल.उपस्थित नागरिक व संबंधित लाभार्थ्यांच्या समक्ष यादीतील लाभार्थ्यांची पात्रता आणि नोंदविण्यात आलेल्या माहितीची वस्तुस्थिती तपासली जाईल.
यादीतील लाभार्थ्यांबाबत काही त्रुटी,बदल किंवा दुरुस्ती आवश्यक असल्यास त्याची नोंद ग्रामसभेत घेण्यात येईल.ग्रामसभेतील कार्यवाही AwaasSoft प्रणालीमध्ये नोंदवून संबंधित पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी व अधिकृत शिक्क्यासह कार्यवाहीचा नमुना अपलोड करण्यात येईल.त्यानंतर नियमानुसार अंतिम प्रतीक्षा यादी निश्चित केली जाणार आहे.
नागरिकांनी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध झालेली यादी तपासून त्यामध्ये काही तथ्यात्मक त्रुटी अथवा दुरुस्ती असल्यास ती ग्रामसभेत मांडावी.पात्र लाभार्थ्यांची अचूक यादी तयार करण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे.
सर्व संबंधित नागरिकांनी उद्या १५ ऑगस्ट रोजीच्या ग्रामसभेला उपस्थित राहून Awaas+ २०२४ सर्वेक्षणातील कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी अंतिम करण्याच्या प्रक्रियेत सहकार्य करावे,असे एकात्मिक ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राहुल काळभोर यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मादी बिबट्याच्या मृत्यूने वनविभागात खळबळ..!

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या नवरगाव नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक-२३४ राखीव वनामध्ये गुरुवार,१३ ऑगस्ट रोजी एक मादी बिबट मृतावस्थेत आढळून आल्याने वन विभागात...

गडचिरोलीत उभारणार ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा विकास व संशोधन केंद्र’- मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत – झाडीबोली संमेलनासाठी दरवर्षी २५ लाखांचा निधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मराठी भाषेचे संवर्धन,स्थानिक बोलीभाषांचे जतन-संवर्धन,संशोधन आणि साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ‘मराठी भाषा विकास व संशोधन...

घोरपडींच्या शिकार प्रकरणी चौघांना रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या पवनी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सावंगी बिटात दोन घोरपडींची शिकार करून त्यांचे मांस कापतांना चौघांना वन विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक करून घटनास्थळावरून...

दुचाकीची पीकअपला जोरदार धडक; तरुणाचा जागीच मृत्यू.. – देसाईगंजच्या कुरुड फाट्यावरील आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुका मुख्यालयापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कुरुड फाटा बसस्थानक नजीक दुचाकीची समोरून येणाऱ्या पीकअपला जोरदार धडक बसल्याने घडलेल्या अपघातात २० वर्षीय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!