Monday, August 24, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्त'ई-पीक पाहणी' मोबाईल ॲपच्या कटकटीतून शेतकऱ्यांची सुटका; गावनिहाय नियुक्त सहाय्यकच घेणार नोंदी..

‘ई-पीक पाहणी’ मोबाईल ॲपच्या कटकटीतून शेतकऱ्यांची सुटका; गावनिहाय नियुक्त सहाय्यकच घेणार नोंदी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने यंदाच्या ‘खरीप हंगाम-२०२६’ साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत  केलेला बदल शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.यापुढे प्रत्येक शेतकऱ्याला स्वतः मोबाइलवरून ई-पीक पाहणी करण्याची आवश्यकता राहणार नसून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंदणी केली जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा मोठा त्रास कमी होऊन मोबाईल ॲपच्या कटकटीतून शेतकऱ्यांची सुटका झाली आहे.
ई-पीक पाहणीच्या माध्यमातून शेतातील प्रत्यक्ष पिकांची अचूक नोंद होणे आवश्यक असल्याने शासनाने यंदा नोंदणी प्रक्रियेत सुधारणा केली आहे. ॲग्रिस्टॅक योजना, डिजीटल क्रॉप सर्व्हे आणि केंद्र सरकारच्या डिजीटल ॲग्रीकल्चर मिशनच्या अनुषंगाने ही प्रक्रिया अधिक पारदर्शक,अचूक आणि तंत्रज्ञानाधारित करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करतांना अडचण येऊ नये म्हणून तालुका प्रशासनाने गावनिहाय सहाय्यकांची नियुक्ती केली आहे.शासनाच्या निकषानुसार प्रत्येक गावात किमान एक,तर जास्तीत जास्त १ हजार ५०० ओनर्स प्लॉटसाठी सहाय्यक नियुक्त करण्याची तरतूद आहे.पीक पाहणी सहाय्यक म्हणून कोतवाल,ग्राम रोजगार सेवक,पोलिस पाटील,आशा सेविका,ग्रामीण उपजीविका अभियानातील कर्मचारी, स्थानिक मानधनावरील कर्मचारी तसेच सामान्य सेवा केंद्र चालक यांची नियुक्ती करण्याची तरतूद करण्यात आली आहे.विशेषतः ई-पीक पाहणीच्या नोंदीवर ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे नियंत्रण राहणार आहे. नोंदीसंदर्भात काही तक्रार किंवा अडचण निर्माण झाल्यास मंडळ अधिकाऱ्यांकडून त्याचे निराकरण केले जाणार आहे.त्यामुळे पीक पाहणी प्रक्रियेत अचूकता व पारदर्शकता राखण्यास मदत होणार आहे.पीक पाहणीची नोंद वेळेत होणे महत्त्वाचे असल्याने शेतकऱ्यांनी विलंब न करता संबंधित गावातील नियुक्त सहाय्यकांशी संपर्क साधून आपल्या शेतातील पिकांची ‘ई-पीक पाहणी’ वेळेत करून घ्यावी,असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशा वादनाचा नवा विश्वविक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  उपस्थितीत आज,रविवार २३ ऑगस्ट रोजी नागपूरच्या रेशिमबाग मैदान येथील आयोजित 'मंथन फॉर युवा' (जेनझी संवाद)कार्यक्रमात ढोल-ताशा...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे दोन मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात दोन दिवसांपासून अधून-मधून पावसाची संततधार सुरू आहे.पावसामुळे काही ठिकाणची नाले पाण्याने भरभरून वाहू लागले आहेत. अश्यातच काही नाल्यांवरील पुल ठेंगणे...

शेतावर गेला ‘तो’ घरी परतलाच नाही; आज सापडला मृतदेह.. – कोंढाळा येथील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-शेतावर धानपिकाला खत मारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा दुसऱ्या दिवशी चक्क मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना ही देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा...

देसाईगंज ठाणेदारांची सट्टा-पट्टी व्यवसायावर धाड; ११ जण गजाआड.. – दुचाकी वाहनांसह साहित्य नेले उचलून..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहरातील मुख्य बाजारपेठेसह तालुक्यातील विविध गावात सट्टा-पट्टी व्यवसायाला मोठे उधाण आल्याची बाब उघडकीस येताच नव्याने रुजु झालेले देसाईगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!