Saturday, May 2, 2026
Homeनागपूरइंस्टाग्रामवरील रीलची जाहिरात पाहणे गृहिणीला पडली महागात..!

इंस्टाग्रामवरील रीलची जाहिरात पाहणे गृहिणीला पडली महागात..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-रोजची दिनचर्या पार पडल्यानंतर अनेकजण फेसबुक,यूट्यूब,इंस्टाग्राम व इतर सोशल मीडिया वरील रील वा इतर मनोरंजनात्मक ऑनलाईन बाबींचा आनंद लुटत असतात.अश्याच प्रकारे एका गृहिणीने इंस्टाग्राम सुरू करून रील पाहणे सुरू केले.रील पाहत असतांनाच ‘वर्क फ्रॉम होम’ ची जाहिरात दिसून आल्याने त्यावर तिने क्लिक करताच आपण सायबर चोरट्यांच्या जाळ्यात केव्हा अडकलोय हेच कळेनासे झाले.कळले तेव्हा तब्बल १२ लाख १६ हजार रुपये गमावले.प्रकरणी सायबर पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल करण्यात आली. सदरची घटना नागपूरच्या मिनी मातानगर परिसरात राहणाऱ्या अनिता नावाच्या महिलेसोबत घडली असून सर्वसामान्य नागरिक सायबर फसवणुकीच्या जाळ्यात अडकू लागल्याचे दिसून येत आहे.
अनिता नामक महिला या गृहिणी असून इंस्टाग्रामवर रील पाहत असतांना त्यांना वर्क फ्रॉम होमची(Work From Home)जाहिरात दिसली.त्यावर त्यांनी क्लिक केल्यावर घरबसल्या काम करून काही रक्कम रुपये मिळतील, असे सांगण्यात आले.घरबसल्या पैसे मिळणार,या आशेने त्यांनी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे काही रक्कम गुंतवली.त्यानंतर जेवढी जास्त रक्कम गुंतवणार तितकाच मोठा परतावा मिळेल,अशी भूलथापा देण्यात आली.या खोट्या आश्वासनांना बळी पडत अनिताने १२ लाख १६ हजार रुपयांची गुंतवणूक केली.बराच कालावधी होऊनही एकही रुपयाचा परतावा मिळाला नसल्याचे लक्षात येताच आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.त्यानुसार महिलेने तात्काळ सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला असून तपास सुरू केला आहे.कित्येकदा ऑनलाईन फसवणूकीपासून सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात येते,पण काहीजण सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकून बळी पडतांना दिसून येतात.त्यामुळे कुठल्याही आमिषाला बळी न पडता सावधानता बाळगणे आवश्यक आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!