उद्रेक न्युज वृत्त :-आशिया चषक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाचा दबदबा असून टीम इंडियाने आतापर्यंत ८ वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे.यात ७ वेळा वनडे तर एकदा टी-२० मधील जेतेपदाचा समावेश आहे.त्यातच “आशिया चषक २०२५” स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यातील हायहोल्टेज सामना आज,रविवार २८ सप्टेंबरला दुबईतील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होणार असून भारतात या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग आणि लाईव्ह प्रसारण पाहायला मिळणार आहे.लाईव्ह स्ट्रिमिंग: SonyLIV ॲप आणि वेबसाईटवर तर टेलिव्हिजनवरील प्रसारण: Sony Sports Ten1,Sony Sports Ten1HD, Sony Sports Ten5,Sony Sports Ten 5 HD यावर तसेच प्रादेशिक भाषेत प्रसारण बघता येणार आहे.आशिया चषक स्पर्धेच्या १७ हंगामातील ४१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना(फायनल)रंगणार आहे. “फायनल आधी यंदाच्या हंगामात दोन वेळा याच मैदानावर भारत-पाक यांच्यातील सामना रंगल्याचे पाहायला मिळाले होते.हे दोन्ही सामने भारतीय संघाने जिंकले आहेत.गट-सामन्यात भारताने पाकिस्तानच्या संघाचा ७ विकेट्सने पराभव केला होता.या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवसह कुलदीप यादवने खास छाप सोडली होती.सुपर फोरमधील लढतीत अभिषेक शर्मा नावाचे वादळ घोंगावले होते. त्याने ३९ चेंडूत केलेल्या ७४ धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने पाकला मात दिली होती. अश्यातच आज होणाऱ्या हायहोल्टेज सामन्यात बाजी कोण मारणार हे पाहणे महत्वाचे ठणार आहे.
आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाचा दबदबा.. -आज होणार भारत-पाकिस्तान क्रिकेट संघाचा हायहोल्टेज सामना..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

