Saturday, April 18, 2026
Homeकोंढाळाआयुष्य बदलायचे असेल तर जीवनात शिक्षण घेणे महत्वाचे-आमदार रामदास मसराम -नितीन...

आयुष्य बदलायचे असेल तर जीवनात शिक्षण घेणे महत्वाचे-आमदार रामदास मसराम -नितीन राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त कोंढाळा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-जीवनात शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे आहे.आयुष्य बदलायचे असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही.आज मी जे काही तुमच्या पुढे बोलतो आहे,ते केवळ शिक्षामुळेच.वाईट मार्गाने जाऊ नका,व्यसनाधीन होऊ नका,चांगले अभ्यास करून जीवन उज्वल करा,असे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम हे आज, सोमवार २८ जुलै रोजी कोंढाळा येथील वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन राऊत यांच्या वाढदिवस दिनाचे औचित्य साधून कोंढाळा पीएमश्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यापूर्वी मार्गदर्शनपर बोलत होते.प्रसंगी आमदार मसराम विद्यार्थ्यांना म्हणाले की,तुम्हाला चॉकलेट हवेय की,पेन हवे.विद्यार्थ्यांनी चॉकलेट म्हटले असता,चॉकलेट हे क्षणिक आहे,विरघळले की त्याचे आयुष्य संपते.मात्र, पेन हा जीवनात अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.एका कलमने सर्वकाही बदलते.त्यामुळे जीवनाचे सोने करून घ्या.खूप अभ्यास करा.गाव आमचे आहे.येणाऱ्या काळात संपूर्ण शाळा डिजिटल बनविण्याचा संकल्प केलेला असून त्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचेही आमदार रामदास मसराम म्हणाले.
देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथे आज नितीन राऊत यांचा वाढदिवस शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक, पेन व चॉकलेट वाटपासह वृक्षारोपण कार्यक्रम घेऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेत पार पडला. प्रसंगी माजी पंचायत समिती सभापती परसराम टिकले, कोंढाळा ग्रामपंचायतीच्या सरपंचा अपर्णा राऊत, सेवानिवृत्त मुख्याध्यापक धनपाल मिसार,माजी सरपंच कैलास राणे,ग्रामपंचायत सदस्य संदीप वाघाडे, सदस्या भुमेश्र्वरी गुरूनुले,नलिता वालदे,शिल्पा चौधरी, सामाजिक कार्यकर्ते अरुण कुंभलवार,शाळेचे मुख्याध्यापक गुणवंत हेडाऊ,शिक्षक योगेश ढोरे,शिक्षक संतोष टेंभूर्णे,नागरिक हितेश तुपट,सचिन झिलपे,निलेश दुपारे,जयंत दुपारे,अथर्व राणे,शाळेतील सर्व शिक्षकवृंद तसेच शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!