Saturday, May 30, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआनंदाची बातमी.. आधार केंद्र चालकांच्या मानधनात वाढ..

आनंदाची बातमी.. आधार केंद्र चालकांच्या मानधनात वाढ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-शासकीय कार्यालयात असो वा खासगी कामाकरीता,बँक खात्यापासून ते शैक्षणिक क्षेत्रात इतर दस्तऐवजांसह आधार कार्डला सगळीकडेच मोठे महत्व प्राप्त झाले आहे.आधार कार्ड शिवाय कुठलेही काम हे अपूर्णच म्हणावे लागेल.अशातच कित्तेक वर्षांपासून आधार केंद्र चालक तुटपुंज्या मानधनावर काम करीत होते.त्यामुळे सदरची बाब शासनाच्या लक्षात येताच आधार केंद्र चालकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. आधार केंद्र चालकांना शासनाच्या वतीने पूर्वी एका आधार नोंदणीसाठी २० रुपये देण्यात येत होते,तर आता एका आधार नोंदणीसाठी ५० रुपये देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे.राज्यात १२ कोटी ८० लाख आधार कार्ड नोंदणी पूर्ण झाली असून ० ते ५ वयोगटातील बालकांची नोंदणी ३९ टक्के झाली आहे.तर ५ ते १७ वर्षे वयोगटातील मुला-मुलींची आधार बायोमेट्रिक करण्यात फारशी प्रगती झाली नसल्याने या वयोगटाच्या नोंदणीत वाढ करण्यासाठी ३ महिन्यात उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या आधार केंद्र चालकांना बक्षीस योजना जाहीर करण्यात आली असल्याचे मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

हाताची दोन बोटे दाखवून सेल्फी काढत असाल तर सावधान..!

उद्रेक न्युज वृत्त :-डिजिटल युगात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे.काही कालावधीपासून डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून नागरिकांची लाखो रुपयांपासून ते कोट्यवधी रुपयांची फसवणूक...

‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ व ‘उच्चरक्तदाब दिना’ निमित्त पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' आणि 'जागतिक उच्चरक्तदाब दिना'चे औचित्य साधून गडचिरोली येथे एक विशेष आरोग्य जनजागृती आणि तपासणी शिबिर उत्साहात पार...

कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा; स्वतःचीच दोन मुले विकली दोन लाखात.. – अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-काही कालावधीपासून चंद्रपूर जिल्ह्यात खतरनाक कारनामे उघडकीस येऊ लागलेत.विविध कारनामे उघड होत असतांनाच नुकताच एका कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा...

आदिवासी महामंडळाच्या नियोजनशून्यतेमुळे शेतकरी संकटात; रब्बीची धान खरेदी केंद्रे अद्याप बंदच.. – गोदामे जुन्याच धानाने गच्च भरलेली..

उद्रेक न्युज वृत्त  गौरव नागपूरकर/देसाईगंज :-रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळाची खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्याने देसाईगंज(वडसा)परिसरासह गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकरी तीव्र चिंतेत सापडले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!