Thursday, September 10, 2026
Homeकोंढाळाआत्ताची मोठी बातमी…आठ वर्षीय मुलाचा गावतलावात बुडून मृत्यू…-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथील घटना…

आत्ताची मोठी बातमी…आठ वर्षीय मुलाचा गावतलावात बुडून मृत्यू…-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथील घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कोंढाळा(देसाईगंज) :-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथील एका आठ वर्षीय मुलाचा गावालगत असलेल्या तलावात(गावतळा) बुडून मृत्यू झाल्याची घटना आज,शनिवार दिनांक-२० जुलैच्या सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली.वंश विजय भुते वय ८ वर्षे, रा.कोंढाळा,ता.देसाईगंज, जि.गडचिरोली असे तलावात बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार,वंश भुते व घरा शेजारील तीन ते चार अल्पवयीन मुले आज दुपारच्या सुमारास गावालगत असलेल्या गावतळ्यात मासे पकडण्यासाठी गेले होते.काहीकाळ झाल्यानंतर सोबत असलेली मुले घरी परतली.वंश हा एकटाच तलावाजवळ होता.अशातच गावातील काही नागरिक सतत पडणाऱ्या पावसामुळे गावतळा पाण्याने किती भरलेला आहे; हे पाहण्याकरिता गेले असता,तलावात एक मुलगा तरंगतांना दिसून आला व तलावाजवळील पारीवर शालेय गणवेश आढळून आला.सदरची माहिती गावातील पोलीस पाटील किरणताई कुंभलवार यांना देण्यात आली.त्यानंतर पाण्यावर तरंगणाऱ्या मुलाला बाहेर काढले असता,त्याची ओळख पटली.पोलीस पाटील कुंभलवार यांनी क्षणाचाही विलंब न लावता सदर घटनेची माहिती देसाईगंज पोलीस ठाण्यास दिली.देसाईगंज पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक चौधरी,पोलीस हवालदार सतीश ठाकरे,मानकर व नंदेश्वर यांनी घटनास्थळ गाठून सदर घटनेचा पंचनामा करून मुलाचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देसाईगंज ग्रामीण रुग्णलयामध्ये पाठविण्यात आले.पुढील तपास देसाईगंज ठाण्याचे ठाणेदार अजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली देसाईगंज पोलीस प्रशासन करीत आहे.

वंश हा गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता तिसऱ्या वर्गात शिकत होता.त्याच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

अजब लाचेची गजब कहाणी..! दोन्ही हातांच्या दहा बोटांचा इशारा करून मागितली १० हजाराची लाच.. – पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  छत्रपती संभाजीनगर :-राज्याच्या विविध भागात सरळ-सरळ तोंडी बोलणी करून अनेकजण लाच घेतांना व एसीबीच्या जाळ्यात अडकतांना दिसून येतात.पण, नुकतेच छत्रपती संभाजीनगर(पूर्वीचे औरंगाबाद)शहरात...

उद्याला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप..!

उद्रेक न्युज वृत्त :-युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने उद्या,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी एक दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!