Tuesday, April 28, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज येथील चावला बंधूंचे माणुसकीचे दर्शन… 

देसाईगंज येथील चावला बंधूंचे माणुसकीचे दर्शन… 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली):-अपघात ग्रस्त लोकांना सतत मदत करणारे आनंदसिंग चावला व जसपालसिंग चावला यांनी अपघातग्रस्त रुग्णाला तात्काळ दवाखाण्यात उपचारासाठी भरती करुन पुन्हा माणुसकीचे दर्शन घडविले आहे.देसाईगंज शहरात नेहमीच्या वर्दळीमुळे सतत अपघात होत असतात.जेव्हा-जेव्हा अपघात घडतात तेव्हा-तेव्हा आनंदसिंग चावला व जसपालसिंग चावला हे मदतीला धाऊन जातात.आज,देसाईगंज-ब्रम्हपुरी मार्गावर वैनगंगा नदिच्या पुलावर दुपारच्या सुमारास दुचाकीस्वार भाष्कर गेडाम याला चारचाकी वाहनाने जबर धडक दिली.घटनेची माहिती मिळताच चावला बंधु ताबडतोब घटनास्थळावर दाखल होऊन त्या अपघातग्रस्त रुग्णाला ग्रामिण रुग्णालय देसाईगंज येथे दाखल केले.आत्तापर्यंत या भावंडांनी १०० हुन अधिक अपघातग्रस्त रुग्णांना मदतीचा हात दिला असुन या इश्वरी कार्याच्या माध्यमातुन माणुसकीचे दर्शन घडविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

इयत्ता दहावी व बारावी परीक्षेचा निकाल लवकरच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गत फेब्रुवारी व मार्च महिन्यात दहावी व बारावीची परीक्षा घेतली होती.त्यात ३७ हजार...

घर बांधणे झाले महाग; लोहा,सिमेंट,विटा अन् रेतीचे भाव कडाडले..

उद्रेक न्युज वृत्त :-बांधकाम साहित्यांच्या वाढत्या किमतींमुळे लोकांच्या बजेटवर मोठा ताण आल्याचे चित्र आहे.यामुळे सर्वसामान्यांना घर बांधणे कठीण झाले आहे.लोहा,सिमेंट,विटा अन् रेतीचे भाव कडाळल्याने...

खेळता-खेळता सांडपाण्याच्या खड्यात पडल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-खेळत असतांनाच घरालगत असलेल्या सांडपाण्याच्या खड्यात पडून ३ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील कोंढाळी येथील शिक्षक...

कारखान्यात आढळून आले बालकामगार; संचालकासह चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी कंपनी असो वा कुठलेही दुकान, हॉटेल,ढाबे,चहाची दुकाने वा इतर आस्थापनांमध्ये बालकांना कामावर ठेवणे गंभीर गुन्हा आहे.यात १४ वर्षे वयाखालील मुलांचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!