Saturday, September 5, 2026
Homeगोंदियाआता ही कोणती भानगड म्हणावी? सख्ख्या सुनेने माजी सरपंच सासूचे चोरले पैसे.....

आता ही कोणती भानगड म्हणावी? सख्ख्या सुनेने माजी सरपंच सासूचे चोरले पैसे.. – सूनेवर गुन्हा दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-पैश्याची लालच अनेकांना चोर बनवून सोडते.त्यातच घरची सूनच घरच्यांच्या पैश्यावर डल्ला मारत असेल तर..अशीच घटना गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या खमारी येथे नुकतीच उघडकीस आली आहे.चक्क सख्ख्या सुनेने माजी सरपंच असलेल्या सासूचे आलमारीतून ४२ हजार रुपये रोख चोरले.सून एवढ्यावरच थांबली नाही तर याची वाच्यता कुणालाही होऊ नये म्हणून चोरलेली रक्कम शेजारच्या घरी ठेवली.यामिनी लक्की तावाडे वय २४ वर्षे,रा.खमारी असे पैसे चोरलेल्या आरोपी सुनेचे नाव आहे.प्रकरणी यामिनी हिच्यावर सासूने दिलेल्या तक्रारीवरून दोन दिवसांपूर्वी म्हणजेच ४ मार्चला गोंदिया ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहितीनुसार,४८ वर्षीय खमारी येथील माजी सरपंच विमला मोहन तावाडे यांनी त्यांच्या बेडरूमच्या गोदरेज आलमारीचे लॉकरमध्ये ४२ हजार रुपये रोख ठेवली होती.अशातच ३ मार्चला विमला यांनी गोदरेजच्या आलमारीचे लॉकर उघडुन पाहिले असता, त्यातील रोख रक्कम आढळून न आल्याने गोंदिया ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केली.पोलिसांनी सर्वप्रथम संशयित व्यक्तींची चौकशी केली.त्यानुसार विमला यांच्या सुनेवर दाट संशय बळवल्याने फोडभक्ती केली.फोड-भक्तिनुसार सून यामिनी हिनेच ४२ हजार रुपये रोख नेत सदरची रक्कम शेजारच्या घरी ठेवली.पोलिसांनी ती रक्कम शेजारच्या घरातून जप्त केली.घटनेसंदर्भात ४ मार्च रोजी गोंदिया ग्रामीण पोलिसांनी यामिनी तावाडेविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार भुते करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!