Thursday, September 3, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता शाळांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती होणार कंत्राटी पद्धतीने..

आता शाळांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती होणार कंत्राटी पद्धतीने..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील सर्व शाळांमध्ये यापुढे फक्त शिपाईच नाही तर सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी हे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येतील.जे कर्मचारी आता सेवेत आहेत ते निवृत्त होईपर्यंत राहतील.पण त्यांची जागा रिक्त झाल्यावर त्यापुढे त्यांच्या जागेवर कंत्राटी भरती केली जाणार आहे,अशी घोषणा शालेय शिक्षण   मंत्री दादा भुसे यांनी आज,गुरुवारी ३ जुलै रोजी विधानपरिषदेत केली.कंत्राटी पद्धतीने भरतीची घोषणा केल्याने विधानपरिषदेत चांगलाच गदारोळ झाला.विरोधकांनी शाळांमध्ये शिपाई यांची पदे ही कायमस्वरूपाचीच झाली पाहिजे.अशी मागणी करत विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला.तसेच मंत्री दादा भूसेंकडून उत्तर अपेक्षित आहे अशी मागणी केली. अनेक शाळांमध्ये सर्वत्र जास्त मुली शिक्षण घेत असतात.एरवी त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे.त्यामुळे कायमस्वरुपी भरती झाली पाहिजे अशी मागणी विरोधकांनी केली.शासन विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या,शाळाबाह्य विद्यार्थी आणि शिक्षणाच्या गुणवत्तेसंदर्भात गंभीर असून याबाबत आवश्यक त्या उपाययोजना राबवित आहे.यु-डायस (UDISE) प्राणलीच्या आकडेवारीनुसार विद्यार्थ्यांची संख्या काहीशी घसरलेली असली तरी त्यामागील कारणे समजून घेऊन योग्य ती कार्यवाही केली जात असल्याचे शालेय शिक्षण मंत्री यांनी म्हटले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!