Thursday, April 30, 2026
Homeनागपूरआता महावितरण सुरू करणार 'स्मार्ट मीटर योजना'..-वीज वापरकर्त्यांना मोबाईल फोनच्या प्रमाणेच वीजेसाठी...

आता महावितरण सुरू करणार ‘स्मार्ट मीटर योजना’..-वीज वापरकर्त्यांना मोबाईल फोनच्या प्रमाणेच वीजेसाठी द्यावे लागणार पैसे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- १ एप्रिलपासून राज्यभरात पारंपरिक मीटरऐवजी स्मार्ट मीटर बसवण्यात येणार होते.मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहीता लागल्याने योजनेची अंमलबजावणी थांबली आहे.आता ४ जून रोजी मतमोजणी झाल्यानंतर आचारसंहीता संपेल.त्या नंतर योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

स्मार्ट मीटर असल्याने वीज खर्च आता निम्म्याने कमी होईल असा दावा केला जात आहे.स्मार्ट मीटर बसवल्यानंतर,वीज वापरकर्ते मोबाईल फोनच्या प्रमाणेच वीजेसाठी पैसे देतील.वीजेवर किती खर्च करायचा हे ग्राहक निवडू शकतात.ग्राहकांना त्यांच्या मोबाईल फोनद्वारे नियमितपणे वापरल्या जाणाऱ्या विजेच्या प्रमाणात माहिती मिळेल.

परिणामी,ग्राहकांना बिल भरल्यानंतर किती पैसे शिल्लक राहतात आणि आर्थिक नियोजनानुसार किती वीज वापरली पाहिजे हे समजेल.याचा अर्थ असा की ग्राहक विजेचा वापर अधिक काटकसरीने करतील कारण त्यांना ते रिचार्ज करण्यासाठी पैसे द्यावे लागतील,त्यांचे लाइट बिल कमी होईल.

महावितरणने थकबाकीचे व्यवस्थापन करण्यासाठी राज्यभर स्मार्ट प्रीपेमेंट मीटर तैनात करण्याची योजना आखली आहे.पहिल्या टप्प्यात,बिल वेळेवर न भरणाऱ्या ग्राहकांना प्रीपेड मीटर दिले जातील, तर उर्वरित ग्राहकांना स्मार्ट मीटर दिले जातील.प्रीपेड मीटर रिफिलिंग केल्यावर वीज पुरवली जाईल.या मीटरसाठी ग्राहकांना काहीही पैसे द्यावे लागणार नाहीत.मीटरच्या किमतीवर केंद्र सरकार अनुदान देईल.

स्मार्ट मीटर हे आयओटी तंत्रज्ञानावरती आधारित आहे.यामध्ये ग्राहकांना त्यांच्या मोबाईल फोनद्वारे त्यांनी केलेल्या वीज वापराची माहिती वेळोवेळी दिली जाणार आहे व ती माहिती ते कुठूनही पाहू शकतात किंवा त्यांच्या घराच्या मीटरचे रिचार्ज करू शकतात. त्यामुळे ग्राहकांचे वीज वापरावरती नियंत्रण राहणार आहे.रात्री,बेरात्री,सुटीच्या दिवशी रिचार्ज केलेला नसल्यास वीज पुरवठा खंडीत होणार नाही,अशी माहिती मिळाली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

शहरी भागात क्युआर कोड असलेली विवाह प्रमाणपत्रे द्या.. – देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सध्या स्थितीत अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन आणि सुरक्षित केली जात आहेत.यात विवाह नोंदणी प्रमाणपत्राचाही समावेश आहे.विवाह नोंदणी प्रमाणपत्राला विशेष...

नक्षलमुक्तीचा ठेवा..! स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७ वर्षात प्रथमच जिल्हाधिकारी गडचिरोलीच्या दुर्गम भागात..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या टोकावर वसलेल्या व छत्तीसगडच्या सीमेवरील अत्यंत दुर्गम व नक्षल प्रभावित भामरागड तालुक्याच्या बीनागुंडा आणि लाहेरी या भागात स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७...

पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘जीवनदायिनी’.. गडचिरोली जिल्ह्यात ३१ रुग्णांना तब्बल ३१ लाख ३५ हजार रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे.गडचिरोली जिल्ह्यात आर्थिक वर्षात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!